महेश साठे : क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सेवाग्राम : खेळ सर्वांनाच आवडतो. बालपणातच नव्हे तर तरूणपणात खेळण्याची मी संधी मिळविली. खेळ आणि खेळाडूंना तयार करण्याचे काम खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षक करीत असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता वेगवेगळी असल्याने ती ओळखून मैदान जागविणाऱ्या खेळाडूंना घडविणे काळाची गरज असून विद्यार्थ्यांना विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्सान द्यावे, असे आवाहनात्मक प्रतिपादन गुप्तचर विभागाचे अधिकारी महेश साठे यांनी केले. ते क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. वर्धा येथील क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. करण्यात आलेले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारणकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. नंदिनी भोंगाडे, दुबे, हेमंत समर्थ, क्रीडा अधिकारी चैताली राऊत, व्यवस्थापक रवींद्र काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महेश साठे पुढे म्हणाले, क्रीडा शिक्षक ग्राऊंड लेवलवर काम करतो. खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी क्वालिटीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. मानसिक सक्षमता वाढवून प्रोत्साहन व खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारणकर व डॉ. नंदिनी भोंगाडे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन तालुका क्रीडा अधिकारी विजय ढोबाळे यांनी केले तर आभार चारूदत्त नाकट यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती.(वार्ताहर)
शिक्षकांकडून मैदान गाजविणारे खेळाडू तयार होणे काळाची गरज
By admin | Updated: April 1, 2017 01:11 IST