रामदास तडस : ‘झेप माझ्या यशाची २०१५’ कार्यशाळासेवाग्राम : आजचा युवक हुशार व ज्ञानसंपन्न आहे. भरकटत जाण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध असल्याने चांगल्या विचार व कार्याची कास धरणे आवश्यक आहे. युवकांनी युवा नेतृत्व विकास कार्यशाळेत सहभागी होऊन सुप्त गुणांना चालना दिली पाहिजे. नीळकंठ अकॅडमी आॅफ सोशल अॅक्टीव्हिटी व युवक बिरादरी वर्धा या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा या क्षेत्रात उत्तम काम करीत आहे. गेल्या ३५ वर्षात आश्रमात कार्यशाळा होत असून देवळीमध्ये या अॅकॅडमीच्या नावाने स्वतंंत्र्य सभागृह उभारणार असल्याची घोषणा खासदार रामदास तडस यांनी समारोपीय भाषणातून केली.नई तालीम समिती परिसरातील शांती भवन मध्ये नीळकंठ अकॅडमी व युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झेप माझ्या यशाची २०१५’ ही तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी खा. तडस बोलत होते. समारोपीय अकॅडमीचे संस्थापक व संघटक प्रभाकर घाटे व नीळकंठ अॅकॅडमी आॅफ सोशल अॅक्टिव्हिटी वर्धाचे उपाध्यक्ष शिवम प्रभाकर उपस्थित होते. याप्रसंगी सामूहिक नृत्य सादर करण्यात आले. विदर्भातून ६० युवक-युवती या शाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळेला गो. से. वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल बारी यांनी ‘विद्यापीठ व परीक्षा’ रोहन प्रकाश यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास व निर्णय क्षमता’, शैलेश केडिया यांनी ‘स्वयंरोजगाराचे कौशल्य’, शिवम प्रभाकर यांनी ‘नृत्य व नाटक’, सुनील पाटणकर यांनी ‘वेळेचे व्यवस्थापन’ या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन अरुण लेले यांचे हस्ते झाले. यशस्वीतेकरिता अनूप दरणे, प्रितम लोणकर, प्रिया बोंद्रे, लुकेश एकोणकर, साक्षी ढाले, पल्लवी बोंद्रे, क्रिशिता ढाले, निहाल वासेकर, श्वेता चावरे, ओझस रेवतकर, देविका घाटे, अश्विनी करमरकर आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)
युवकांनी चांगल्या विचारांची कास धरण्याची गरज
By admin | Updated: October 11, 2015 00:29 IST