शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

समाजातील दर्जेदार शिक्षणासाठी सृजनशील शिक्षकांची आवश्यकता

By admin | Updated: March 2, 2016 02:35 IST

प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेत प्राध्यापकांची घोडदौड विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक कामगिरी निर्देशांकानुसार (एपीआय स्कोअर)

गिरीश्वर मिश्र : दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोपवर्धा : प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेत प्राध्यापकांची घोडदौड विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक कामगिरी निर्देशांकानुसार (एपीआय स्कोअर) अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी सुरू आहे. या कारणास्तव शैक्षणिक दर्जा सुधारण्याऐवजी प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होत आहे. दर्जेदार शिक्षणासाठी प्राध्यापकांमध्ये सृजनशीलता वाढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गिरिश्वर मिश्र यांनी केले. स्थानिक यशवंत महाविद्यालयात नॅक प्रायोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. महाविद्यालयाचे आयक्वॅक समन्वयक डॉ. विलास ढोणे मंचावर उपस्थित होते. डॉ. मिश्र म्हणाले, शिक्षक हे प्रगतीशील समाजाचे आधारस्तंभ आहेत. समाजाच्या जडणघडणीत त्यांचा कार्यभार मोठा आहे. ही जबाबदारी ओळखून प्राध्यापकांनी समाज शिक्षक म्हणूनही कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय चर्चासत्राच्या विषयतज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण करण्यासाठी नॅक संस्था कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी प्राध्यापकांबरोबरच, शिक्षण संस्थेची प्रशासकीय व्यवस्था, पालक व विद्यार्थी यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थेची प्रशासकीय व्यवस्था, पालक व विद्यार्थी यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आयक्वॅकचे सह-समन्वयक प्रा. एस.एम. खान यांचा सत्कार करण्यात आला. नागपूरच्या अन्नासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्या आयक्वॅक समन्वयक डॉ. वर्षा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. क्षिप्रा सिंघम व डॉ. रविशंकर भोर यांनी केले. आयोजनासाठी डॉ. उत्तम पारेकर, प्रा. भोयर, प्रा. देशमुख, डॉ. बोबडे, डॉ. निंबाळकर, डॉ. भुगूल, प्रा. नारायणे, प्रा. बेले, प्रा. लोहकरे, डॉ. बेंडले, डॉ. खोडे, प्रा. चव्हाण, डॉ. धोटे, प्रा. सिंदूरकर, प्रा. मुरकुटे इत्यादींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)