शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

वंचित घटकातील मुलांसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज

By admin | Updated: February 7, 2016 00:14 IST

वंचित घटकांतील मुलांना संस्कारासह शिक्षणही मातृभाषेतून देणे गरजेचे आहे. सर्वांची ही आपली जबाबदारी आहे ही भावना जोपासण्याची गरज आहे.

दत्ता मेघे : मानस मंदिरच्या तुकडोजी प्राथमिक शाळेत संमेलनवर्धा : वंचित घटकांतील मुलांना संस्कारासह शिक्षणही मातृभाषेतून देणे गरजेचे आहे. सर्वांची ही आपली जबाबदारी आहे ही भावना जोपासण्याची गरज आहे. त्यातूनच वंचित घटकांचा विकास होईल असे मत माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठान मानस मंदिरच्या तुकडोजी प्राथमिक शाळेत आयोजित संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्राचार्य भाऊ देशमुख उपस्थित होते. मेघे यावेळी म्हणाले, मुलांमध्ये राष्ट्रसंताच्या विचारानुसार संस्कार घडविण्याचे कार्य मोलाचे आहे. हे काम आज शाळांमधून होताना दिसत नाही. असे संस्कार रुजवितांनाच इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण देण्याचा विचार ंसंस्थेने करावा. त्यासाठी मोठी जागा घ्यावी. आपण सर्व ते सहकार्य करू अशी ग्वाही मेघे यांनी दिली. संस्थाध्यक्ष प्राचार्य देशमुख म्हणाले, श्रमसंस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी श्रमाचे महत्व सर्वांनी जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी बापूराव शहाणे, वसंत ठाकरे, विजय मंथनवार, मुख्याध्यापिका वीणा भोयर यांची उपस्थिती होती. स्मृती पुरस्कार सोहळ्यात दत्ता मेघे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याना पुरस्कृत करण्यात आले. दिवंगत डॉ. राजेंद्र सुपे, कौसल्या इंगोले, अविनाश जगताप, जरयराम हाडके, आत्माराम झंझाड, दादा बुरांडे, हरिश्चंद्र देशमुख, रमणिक चावडा, मामा देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रोख पुरस्कार, गणवेश व भेटवस्तू स्वरूपात विद्यार्थ्याना पुरस्कार देण्यात आले. शाळेच्या विज्ञान प्रदर्शनाचे व मानस हस्तलिखिताचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रसंताच्या पुतळ्यास हारार्पण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत निर्मला किनगावकर, अल्का देशमुख, सुमन लोहकरे, मारोती बरडे, मनोज उईके आदींनी केले. संमेलनाचा समारोप जि. प. सभापती मिलिंद भेंडे व यामिनी भेंडे यांच्या उपस्थितीत झाला. श्रमसंस्कार व मातृभाषेचे महत्त्व बिंबविणारी अशी शाळा माझ्या पाहण्यात आली नाही, असे गौरवोद्गार भेंडे यांनी काढले. शाळेत ई-लर्निंगची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. माजी मुख्याध्यापक सुमित्रा डंभे तसेच शिक्षिका शोभा मंथनवाव आणि वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. विविध उपक्रमाबाबत मुख्याध्यापक भोयर यांनी माहिती दिली. विद्यार्थी स्वयंसेवक सूर्या भेंडे, अनुप पावशेकर, गायत्री कदम, नयन जयस्वाल, हर्षल परतेकी, संकेत राऊत यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. मारोती बरडे, मनोज उईके, पंकज देशमुख, प्राजक्ता मुते, अपेक्षा देशमुख, शोभा जाधव, रेखा लखमापुरे, चंदा तायडे आदींनी सहकार्य केले. पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)