शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राकाँ इव्हीएमसह मनुस्मृतीचे दहन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:20 IST

देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देफौजिया खान :१७ ला नागपुरात संविधान बचाव आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात प्रतिकात्मक इव्हीएम मशीन तसेच मनुस्मृतीचे दहन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष फौजिया खान यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.खान पुढे म्हणाल्या, ज्या संविधानाच्या आधारावर देशाची लोकशाही बळकट व सर्वसमावेशक आहे. त्या बदल करून सत्तारूढ सरकार समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने १७ जुलैला नागपूर येथे संविधान बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात दिल्ली येथून संविधान बचाव आंदोलनाला सुरूवात झाली. त्यानंतर मुंबई येथे सुध्दा हे आंदोलन करण्यात आले. विभागीयस्तरावर पहिले संविधान बचाव आंदोलन नागपूर येथे करण्यात येत आहे. शरद पवार यांच्यासह राकॉचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लक्ष केंद्रीत करून आहे. यापूर्वी हल्लाबोल यात्रा विदर्भातून काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याची जाणीव वैदर्भीय शेतकºयांना आहेच, असेही त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुरेश देशमुख, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, जिल्हाध्यक्ष शरयु वांदीले, किशोर माथनकर उपस्थित होते.विचारधारेवर नव्हे विरोधकांवर हल्लालोकशाही प्रधान देशात प्रत्येकाला समान अधिकार आहेत. मात्र, केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारकडून त्या अधिकारांचे हनन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या जनहित विरोधी धोरण अवलंबुन विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विचारधारेचा विरोध मान्य आहे. मात्र, त्यांच्यावर हल्ले करून संपविणे हा प्रकार निंदनीयच असल्याची घनाघाती टिकाही यावेळी सरकारवर फौजिया खान यांनी केली.