शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:10 IST

भारत सरकारच्या जसंधारण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर जलसंधारण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्राला दहा पुरस्कार जाहीर झाले. यात वर्धा जिल्ह्याला नदी पुनर्जीवन या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन, कल्पना व नवतंत्रज्ञाचा वापर यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सद्भावना ग्रामीण विकास संस्थेला जाहीर झाला.

ठळक मुद्देसद्भावना ग्रामीण विकास संस्था सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत सरकारच्या जसंधारण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर जलसंधारण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्राला दहा पुरस्कार जाहीर झाले. यात वर्धा जिल्ह्याला नदी पुनर्जीवन या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन, कल्पना व नवतंत्रज्ञाचा वापर यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सद्भावना ग्रामीण विकास संस्थेला जाहीर झाला. सदर पुरस्कार दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला असून तो वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वीकारला. सद्भावना ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने व मिलिंद भगत यांनी पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी केंद्रीय जलसंसाधन व नदी विकास, गंगा शुद्धीकरण खात्याचे राज्यमंत्री सावरलाल जाट यांची उपस्थिती होती. सद्भावना संस्थेने आलोडी-साटोडा परिसरात बांध तसेच बंधारे बांधून शेतीसाठी पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.