शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल; ५८ पैकी ८ कामेच पूर्ण

By admin | Updated: December 29, 2014 01:56 IST

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ ...

वर्धा : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ अद्यापही ५० गावांतील कामे निधी अप्राप्त असल्याने रखडल्याची माहिती पूढे आली आहे़राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत २०१४-१५ मधील जिल्ह्यातील ५८ गावांपैकी केवळ आठच कामे पूर्ण होऊ शकली आहेत़ या कामांकरिता उपलब्ध निधी ८ कोटी ७२ लाख ३९ हजार रुपयांपैकी केवळ ६० टक्के निधी खर्च झाला आहे. अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ५० कामे रखडल्याचेही सांगण्यात आले आहे़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ४२६ गावांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता़ यापैकी ३२८ गावांकरिता अद्यापही निधी प्राप्त झालेला नाही़ आठ दिवसांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे़ यावरून या वर्षीचा निधी पाठविण्यात आला; परंतु मागील वर्षीचा निधी रोखून धरण्यात आला आहे़ याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत दिली. यावर उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी टंचाईचा निधी वेगळाच असतो़ सदर निधी त्वरित मिळणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधले. टंचाईकरिता तालुकानिहाय आढावा बैठक बोलविण्याबाबत अध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी पत्र पाठविण्याची सूचना शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भेंडे यांनी केली. शिवाय ज्यावेळी आराखडा मंजूर केला जातो, त्याचवेळी ४० टक्के निधी मंजूर करण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा आणि तो ग्रामविकास व पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात यावा, याकडेही लक्ष वेधण्यात आले. या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाई संदर्भातील मागणी घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.निधी प्राप्त न झाल्याने आर्वी तालुक्यातील पाचोड, गुमगाव, सालफळ, निझामपूर, बेढोणा, हिवरा, हिवरा (तांडा), बोदड, वाढोणा, खुबगाव, पाचोड, बोथली आणि खरांगणा येथील कामे रखडलेली आहेत़(जिल्हा प्रतिनिधी)योजनेची कामे रखडलेली गावेआष्टी तालुक्यातील वडाळा, सत्तारपूर, धाडी, आबादकिन्ही, तळेगाव (श्या़पं़), काकडदरा, बोरखेडी, अजितपूर. आनंदवाडी, गोदावरी, टेकोडा व चिस्तूर, देवळी तालुक्यातील गुंजखेडा, हिवरा (हाडके), निमसडा, भोजनखेडा आणि इंझाळा येथील कामे रखडली आहेत़ हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव, वेळा, वेणी, आजनसरा, डोरला, इंझाळा व कारंजा तालुक्यातील भालेवाडी, गारपीट, जोगा व मदनीचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (मिर्झापूर), बोडखा, झुणका, कोरा, समुद्रपूर, निंबाळा, जिरा तसेच सेलू तालुक्यातील कोटंबा, केळझर तर वर्धा तालुक्यातील धुळवा या गावांतील कामेही रखडलेली आहेत़