ऑनलाईन लोकमतआर्वी : नजीकच्या नांदपूर येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी ६६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा श्री गणेशा माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाला जि.प.चे अध्यक्ष नितिन मडावी, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव काळे, जि.प. सदस्य सुचिता कदम, पं.स.चे उपसभापती धर्मेंद्र राऊत, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष नामदेव मसराम, पं. स. सदस्य अशोक तुमडाम, सरपंच लक्ष्मी मरसकोल्हे, उपसरपंच प्रमेश पखाले, ग्रा.पं. सदस्य नरेंद्र जुवारे, विशाल सोनटक्के, गजानन मुरवे, बेबी रणगिरे, पुष्पा पखाले, शेनेवार, बावने आदींची उपस्थिती होती.प्रत्येक गावातील नागरिकांना पिण्या योग्य स्वच्छ पाणी मिळावे या हेतून सदर विकास कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामामुळे गावातील पाणी समस्या निकाली निघणार आहे, असे माजी आमदार दादाराव केचे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन नांदपूर ग्रामपंचायतचे सचिव लांबटोंगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोपाल मरसकोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदपूरचा पाणी प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:42 IST
नजीकच्या नांदपूर येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी ६६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा श्री गणेशा माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते करण्यात आला.
नांदपूरचा पाणी प्रश्न सुटणार
ठळक मुद्दे६६ लाखांचा निधी मंजूर : राष्ट्रीय पेयजल योजनेतून कामे होणार