शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

दोन टक्क्यात अडकले ‘नम्मा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:34 IST

स्वच्छ व सुंदर वर्धासाठी शहरातील पाच मुख्य ठिकाणी ६०.१९ लाखांचा निधी खर्च करून पालिकेच्यावतीने ‘नम्मा टॉयलेट’ लावण्यात येत आहे. त्याची बहुतांश प्रक्रियाही पालिकेच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराचे दुर्लक्ष : ६०.१९ लाखांचा खर्च अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ व सुंदर वर्धासाठी शहरातील पाच मुख्य ठिकाणी ६०.१९ लाखांचा निधी खर्च करून पालिकेच्यावतीने ‘नम्मा टॉयलेट’ लावण्यात येत आहे. त्याची बहुतांश प्रक्रियाही पालिकेच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे. याला महिना लोटला तरी कंत्राटदाराने नगर परिषदेला अदा करावयाची एकूण कामाची २ टक्के रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने या हे टॉयलेट अडकले आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ हा उपक्रम लक्षात घेत स्वच्छ व सुंदर वर्धेच्या दिशेने सध्या वर्धा नगर पालिकेची वाटचाल सुरू आहे. शहरातील काही गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहच नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. महिलांसह पुरुषांना योग्य सोयी-सुविधा देण्यासाठी वर्धा शहरातील पाच महत्त्वाच्या ठिकाणी नम्मा टॉयलेल लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.यात कंत्राटदाराची निवडही झाली आहे. सदर कामाचा कंत्राट अर्बन इंडस्ट्रीज लि. चेन्नई तामिळनाडु यांना देण्यात आला आहे. शहरात लवकरात लवकर नम्मा टॉयलेट लागावेत म्हणून वर्धा न.प. प्रशासनाने या कंत्राटदाराला ४ डिसेंबर २०१७ च्या पत्रानुसार एकूण कामाच्या २ टक्के रक्कम तात्काळ भरण्यात यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याबाबतची माहिती ई-मेलद्वारे पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिली; पण महिना लोटूनही कंत्राटदाराने सदर रक्कम नगर परिषदेला अदा केली नाही. परिणामी, नगर पालिकेच्या अडचणीत भर पडल्याचे बोलले जात आहे.सदर स्वच्छतागृह स्वच्छ वर्धेसाठी फायद्याचे ठरणार आहे. यामुळे नम्मा टॉयलेट शहरात लवकरात लवकर कसे लावता येतील, यासाठी पालिका प्रशासन, न.प. लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाºयांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.९० दिवसांत स्वच्छतागृह लावणे क्रमप्राप्तअंदाजपत्रकानुसार कंत्राटदाराने काम करणे गरजेचे असून काम सुरू करण्यापूर्वी न.प. अभियंत्याकडून कामाचे मार्कआऊट करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय कंत्राटदाराने आदेशापासून ९० दिवसांत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.या पाच ठिकाणांची निवडशहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, आर्वी नाका परिसर तथा बडे चौक परिसरात ६० लाख १९ हजार ८४० रुपये खर्च करून नम्मा टॉयलेट लावण्यात येणार आहेत.