शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या नावावर ‘त्या’ विभागाचे केवळ ‘फोटोसेशन’

By admin | Updated: October 24, 2016 00:32 IST

जिल्ह्यात दारूबंदी असून अवैध दारूविक्रीला आळा बसावा, त्यावर अंकुश असावा याकरिता स्वतंत्र असा दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग आहे.

दारूबंदीचे धिंडवडे : कारवाईत तीन जिल्ह्यांचा सहभागआकोली : जिल्ह्यात दारूबंदी असून अवैध दारूविक्रीला आळा बसावा, त्यावर अंकुश असावा याकरिता स्वतंत्र असा दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग आहे. असे असले तरी हा विभाग निष्क्रीय असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी घडला. कारवाईच्या नावावर इतरत्र विखुरलेले ड्रम एका ठिकाणी गोळा करून फोटोसेशन करण्यात आले. यानंतर कारवाईचा बनाव करण्यात आल्याचे उघड झाले. दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी अवैध गावठी दारू अड्ड्यावर धडक मोहीम राबवली होती. विभागीय भरारी पथकाचे कैकाडे, मते यांच्या नेतृत्वातील या मोहिमेत अमरावती भरारी पथकाचे बेदरकर, नागपूर पथकाचे मोहतकर, वर्ध्याचे डी.बी. कोळी व कामुटे या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २५ कर्मचारी सहभागी झाले होते. आकोली नजीकच्या अवैध गावठी दारू अड्ड्यावर धाडीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रथम पोटपूजा केली. तेथे हातगाडीवर असलेल्या भुईमुगांच्या भाजल्या शेंगांवर ताव मारला. तोपर्यंत दारूविक्रेत्यांना सवड मिळाली व त्यांनी गावठी दारूने भरलेल्या डबक्या घेऊन जंगलाकडे पोबारा केला. शेवटी विखुरलेले रिकामे ड्रम गोळा करून फोटो काढले व चालते झाले. अशाने दारूबंदी होणार काय, हा प्रश्नच आहे.दारूबंदी व्हावी म्हणून महिलांनी एल्गार पुकारला. वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून महिला काय करीत आहे. पोलीस प्रशासनही सहकार्य करीत आहे; पण दारूबंदी उत्पादन शुल्क हा स्वतंत्र विभाग कारवाईच्या नावावर थोटांग करताना दिसतो. ही कारवाई पाहून ग्रामस्थांची चांगली करमणूक झाली.(वार्ताहर)