शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विश्वशांतीसाठी ‘नागराज’ची सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:32 IST

ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली.

ठळक मुद्देदररोज ८० कि.मी.चा प्रवास : २०१७ पासून जगभ्रमंतीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली. येथे दोन दिवस मुक्काम करुन पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर तेलंगणाकडे रवाना होणार आहे.नागराज गौडा मल्लेगौडा (५०) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मुळचा कर्नाटकातील हासन येथील आहे; मुंबईत आल्याने त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या ठिकाणाहून ही सायकल यात्रा ३ डिसेंबर २०१७ ला सुरु केली. पाणी बचाव-हरियाली बचाव, जिओ और जिने दो, गोरक्षा, सनातन, सर्वधर्म समभाव, देशभक्ती विश्वशांती, हेल्थ ईज वेल्थ अशी जनजागृतीकरित नागराज यांनी आपला प्रवास सुरु केला. ते दररोज सायकलने ८० कि.मी.चा प्रवास करतात. त्यांनी मुंबईनंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व नागपूर मार्गे वर्ध्यात प्रवेश केला आहे. सेवाग्राम आश्रमात मुक्कामी असून पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर ते तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, बंगाल, झारखंड व बिहार या ठिकाणीही जाणार असल्याचे सांगितले.ना राहण्याचे नियोजन ना खाण्यापिण्याचेमुंबई येथून निघालेली नागराज यांची सायकलस्वारी सतत सुरु आहे. कोणत्या गावाला कुठे थांबायचे, कुणाकडे जेवन करायचे याचे काहीही नियोजन नाही. वाटेत जे गाव लागेत त्या गावात थांबायचे मिळेल ते खायचे, असाच यांचा दिनक्रम सुरु आहे. त्यांना या जगभ्रमंतीमध्ये मंदिर, आश्रम, गुरुव्दारा, आर्य समाज भवन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आदिंचे सहकार्य मिळत आहे.जगातील शांती नांदावी याकरिता ही सायकलवारी सुरु केली असून आता सेवाग्राम येथून तेलंगणा, कर्नाटकला जाणार. कर्नाटक मुळ गाव असल्याने येथे पावसाच्या दिवसांत दोन महिने मुक्काम करणार आहे. त्यानंतर पुढील प्रवास सुरु होईल. प्रवासदरम्यान मार्गावर असलेले मार्ग दाखविणारे फलकच प्रवासाकरिता मार्गदर्शक ठरत आहे. अडचण आल्यास नागरिकांना विचारुन पुढील प्रवास सुरु करतो. या प्रवासात नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.- नागराज गौडा, यात्रेकरू.