शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतून धावणार नागपूर-मुंबई ‘बुलेट ट्रेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाकडून नागपूर - मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प नियोजित आहे. त्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे. जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाला पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बारा ठिकाणी राहणार थांबे२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या नागपूर - मुंबई या बुलेट ट्रेनचे तब्बल बारा ठिकाणी थांबे राहणार आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील दोन ठिकाणांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील केवळ २३ एकर जमीन होणार अधिग्रहितनागपूर - मुंबई ही बुटेल ट्रेन समृद्धी महामार्गाच्या शेजारून धावणार असून, त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करतानाच अर्ध्याहून अधिक जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी २३ एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पनॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लि.च्यावतीने पूर्णत्वास येणारा हा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने होणार आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प राज्य व केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर याचा राज्यातील तब्बल १३ जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्र सरकारकडून नियोजित असून, त्याबाबतची पर्यावरण व सामाजिक विचार-विनिमयाबाबतची सभा सोमवार, २२ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. या सभेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती शासनाला पाठवली जाणार आहे.- मनोजकुमार खैरनार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वर्धा.

२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार बुलेट ट्रेन

नागपूर ते मुंबईपर्यंतचा बुलेट ट्रेनचा एकूण मार्ग ७५३ किलोमीटरचा राहणार आहे. या रेल्वे मार्गावर ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावेल, अशा गुणवत्तेचा हा रेल्वे रुळ राहणार आहे. इतकेच नव्हे तर ही बुलेट ट्रेन २५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे