शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: July 14, 2017 01:33 IST

येथील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाले; पण ९० टक्के कर्मचारी शासनाच्या एका अध्यादेशाने नगर

अध्यादेशामुळे अडचण : समायोजन करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाले; पण ९० टक्के कर्मचारी शासनाच्या एका अध्यादेशाने नगर पंचायतचे कर्मचारी होण्यापासून वंचित राहिलेत. या सर्व कर्मचाऱ्यांचा पदधारणा अधिकार कायम ठेवून त्यांचे नगर पंचायतीमध्ये समायोजन करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत न.पं.चे मुख्याधिकारी अंकुश जाधव व नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्मचारी कामबंद आंदोलन करीत असल्याने शहरातील पाणी पुरवठा व स्वच्छता तसेच दिवाबत्तीचा फटका नागरिकांना बसणार आहे. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक यांच्या १२ जुलै २०१७ च्या आदेशानुसार ग्रा.पं. मध्ये तुटपुंज्या वेतनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना नगर पंचायतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार नाही. यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. वास्तविक, या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत भविष्यात कायम होऊ या आशेवर नाममात्र वेतनावर सेवा दिली. हा निर्णय त्यांच्यावर अन्याय करणारा तथा त्यांच्या पोटावर लाथ मारणारा ठरणार आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष पसरला आहे. परिणामी, नगर पंचायतीचे कर्मचारी म्हणून समायोजन करावे, अशी मागणी करीत सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने ही समस्या वरिष्ठांना कळवावी आणि न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कर्मचारी प्रशांत शहांगडाले, नारायण दांडेकर, प्रभाकर करनाके, सुधाकर भलावी, राजेंद्र वरठी, आशिष ढोबळे, रामराव मुळे, मारोती कांबळे, संध्या लिल्हारे व अन्य कर्मचाऱ्यांनी निवेदनातून मुख्याधिकारी जाधव व नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांना केली आहे. यातील निर्णयाकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाणी पुरवठा, दिवाबत्तीचा प्रश्न होणार बिकटसेलू नगर पंचायतीच्या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता तथा दिवाबत्तीचा प्रश्न बिकट होणार आहे.शहरात हाहाकार माजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नगर पंचायतीने ही बाब शासनाला कळवून त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी सर्वस्तरातून करण्यात येत आहे.