शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायती वेटिंगवर ; ग्रामपंचायतींनी उधळला गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

वर्धा लगतच्या आलोडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील एका जागेकरिता पोट निवडणूक घेण्यात आली. यात आमदार डॉ. पंकज भोयर समर्थित सरपंच गटाचे प्रवीण नागोसे यांनी ४४३ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेस समर्थित आकाश बुचे यांचा पराभव केला. सरपंच अजय जानवे आणि उपसरपंच बादल विरुटकर यांच्या नेतृत्वात हा विजय मिळविता आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कारंजा, आष्टी, सेलू व समुद्रपूर या चार नगरपंचायतीमधील ५४ जागांकरिता सार्वत्रिक तर ६३ ग्रामपंचायतीमधील ८४ जागांकरिता २१ डिसेंबरला एकाच दिवशी मतोत्सव पार पडला. नगरपंचायतीमधील मागास प्रवर्गाच्या जागा रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून सदस्य निवडण्याकरिता १८ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला झालेले मतदार आणि १८ जानेवारीला होणारे मतदान याचा निकाल १९ जानेवारीला जाहीर होणार असल्याने नगरपंचायतींमधील सदस्यांना तोपर्यंत ‘ वेट ॲण्ड वॉच ’ ची भूमिका घ्यावी लागणार आहे. पण, ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी निकाल जाहीर झाल्याने ग्रामपंचायत परिसरात गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला.

आलोडीत भाजप समर्थित सरपंच गटाचा विजयवर्धा लगतच्या आलोडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील एका जागेकरिता पोट निवडणूक घेण्यात आली. यात आमदार डॉ. पंकज भोयर समर्थित सरपंच गटाचे प्रवीण नागोसे यांनी ४४३ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेस समर्थित आकाश बुचे यांचा पराभव केला. सरपंच अजय जानवे आणि उपसरपंच बादल विरुटकर यांच्या नेतृत्वात हा विजय मिळविता आला. माजी सरपंच प्रीती देशमुख, सदस्य गौरव गावंडे, पार्बता रहांगडाले, विद्या किन्हेकर, कल्पना वाटकर यांच्यासह सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

सेलडोहमध्ये सोनटक्के विजयीसेलू : तालुक्यातील सेलडोह ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधील रिक्त जागेकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत नामदेव सोनटक्के यांनी भाजपचे रजत अंबाडाळे यांच्यावर १०७ मतांनी मात करुन विजय मिळवला. दोन गटांत झालेल्या थेट लढतीत केशरीचंद खंगार गटाचे प्रशांत सोनटक्के विजयी झाले. सोनटक्के यांना २२९ तर अंबाडाळे यांना १२२ मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून नितीन बेताल यांनी काम पाहिले. 

माणिकवाडात काँग्रेसचे शिंगारे विजयी

तारासावंगा :  माणिकवाडा ग्रा.पं. मधील वाॅर्ड क्रमांक २ मधील एका सदस्यासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस समर्थित पंजाबराव शिंगारे यांना एकूण  २०५ मते तर, भाजपाचे जयप्रकाश सनेसर यांना १७७ मते मिळाली. शिंगारे यांचा २८ मतांनी विजय झाला. चुरशीच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय झाल्याने ग्रामपंचायत माणिकवाडा येथे  आता काँग्रेसचे ६ तर, भाजपाचे ४ सदस्य आहेत. सरपंच मात्र भाजपाचे आहे. पंजाबराव शिंगारे यांच्या विजयाबद्दल माणिकवाडा येथील काँग्रेसचे केशवराव ढोले, माधव माणमोडे, अंकित कावळे, रामभाऊ बारंगे, बाबूलाल भादा, ओंकार खवशी, धनराज कातडे, मंगेश शिंगारे, मोहन कावळे, पंढरी खाडे यांनी मोलाची भूमिका बजावली.

कारंजा तालुक्यात आठ ग्रा.पं.चा लागला निकालकारंजा (घा.) : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये मनोहर रुपचंद डोंगरे, शेलगाव (लवणे) येथे गौरव चंद्रभान हिंगवे, आजनादेवी येथे लक्ष्मण बाबुराव देवासे, जऊरवाडा (खैरी) येथे रोशन सुखदेव कुंमरे हे विजयी झाले. लादगड येथील ३, सिंदीविहिरी १, सावल १ व चोपन १ अशा सहा जागांकरिता उमेदवारी अर्जच आले नसल्याने निवडणूक झाली नाही. धावस (बु.) आणि धर्ती येथील प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. तर ४ जागांकरिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. खैरी पुनर्वसन येथील ग्रासम्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली होती. पण, ती पूर्णत्वास गेली नसल्याने येथील ग्रामस्थांनी एकीचा परिचय देत ‘नोटा’ला पसंती दिली.

आर्वी तालुक्यात चार भाजपकडे तर तीन काँग्रेसकडे

-  देऊरवाडा/आर्वी: तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात होते. या सात जागांपैकी चार जागा भाजप समर्थित तर तीन जागांवर काँग्रेस समर्थित उमेदवार निवडून आले. बेनोडा ग्रा. पं. च्या वॉर्ड क्रमांक २ मधून मीना होरेश्वर मेश्राम, देऊरवाडा वॉर्ड क्रमांक ३ मधून वैशाली सतीश खडसे तर वर्धमनेरीतील वॉर्ड क्रमांक १ मधून विक्की श्रावण मसराम हे तिघे काँग्रेस समर्थित उमेदवार निवडून आले. 

-  तर काचनूर येथील वॉर्ड क्रमांक १ मधून पुणाजी ओंकार भलावी व नितीन रमेश देऊळकर तर प्रभाग क्रमांक २ मधून प्रशांत गणपत घाटेवाड व नम्रता संजय अंभोरे हे निवडून आले. हे चारही सदस्य भाजप समर्थित आहेत. 

टेंभा ग्रामपंचायतीमध्ये भाजपवर ‘प्रहार’हिंगणघाट : तालुक्यातील टेंभा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रंजित गराड यांनी भाजप समर्थित सरपंच गटाचे अमोल उमाटे यांचा २५ मतांनी पराभव केला. यात रंजित गराड यांना १४९ मते तर अमोल उमाटे यांना ११९ मते मिळाली.

कवठा ग्रा.प.मध्ये काँग्रेसचे वर्चस्वपुलगाव : नजीकच्या कवठा (रेल्वे) येथील ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार अंकुश मडावी ७१ मतांनी निवडून आले. आमदार रणजीत कांबळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवून अंकुश मडावी यांनी पुन्हा विजयाची परंपरा कायम ठेवली. विजयाबद्दल आ. कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, माजी पंचायत समिती सभापती मनोज वसू, माजी सरपंच नागोराव महल्ले, चंदू कांबळे, जय महल्ले, पुरुषोत्तम राऊत, कैलास मडावी, नितीन राऊत आदींनी आनंद व्यक्त केला.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक