शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST

अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. एकूच सध्या थंडी वाढत असतानाच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देसेलू, समुद्रपूर, आष्टी, कारंजात निवडणूक : अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सेलू, आष्टी, समुद्रपूर आणि कारंजा (घा.) या चार नगरपंचायतीच्या निवडणुका असल्याने मंगळवारी प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले. अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. एकूच सध्या थंडी वाढत असतानाच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.अनेक ठिकाणी महिलांना मिळाली संधीआष्टी : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीचे आरक्षण मंगळवारी काढण्यात आले. यात प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ३ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण नामाप्र, प्रभाग क्रमांक ६ अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण नामाप्र, प्रभाग क्रमांक ८ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक १० व ११ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १५ नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक १६ व १७ सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाल्याचे सांगण्यात आले.उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारंजात काढली सोडतकारंजा (घा.) : येथील नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी पार पडली. याप्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक तसेच मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर नवीन उमेदवार त्या वॉर्डामध्ये कोण राहिल याचा शोध राजकीय पक्षाकडून घेतला जात आहे. वॉर्ड क्रमांक १ हा अनुसूचित जाती महिला राखीव असून वॉर्ड क्रमांक २, १०, ११, १५, १६, १७ सर्वसाधारण उमेदवारांसाठी निश्चित झाला आहे. तर सर्वसाधारण स्त्री उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक ३, ६, ७, १२, १३ निश्चित झाला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता वॉर्ड क्रमांक ५ आणि १४ निश्चित झालेले आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक ४, ८, ९ निश्चित झालेले आहे. अशाप्रकारे १७ वॉडची विभागणी झाल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांची अपेक्षा बाळगून असलेले बरेच उमेदवार हिरमुस झाले आहेत. सोडत यश चरडे व सुमित चरडे या लहान मुलांनी चिठ्ठी काढून काढली.कारंजा (घा.) : येथील नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी पार पडली. याप्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक तसेच मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर नवीन उमेदवार त्या वॉर्डामध्ये कोण राहिल याचा शोध राजकीय पक्षाकडून घेतला जात आहे. वॉर्ड क्रमांक १ हा अनुसूचित जाती महिला राखीव असून वॉर्ड क्रमांक २, १०, ११, १५, १६, १७ सर्वसाधारण उमेदवारांसाठी निश्चित झाला आहे. तर सर्वसाधारण स्त्री उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक ३, ६, ७, १२, १३ निश्चित झाला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता वॉर्ड क्रमांक ५ आणि १४ निश्चित झालेले आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक ४, ८, ९ निश्चित झालेले आहे. अशाप्रकारे १७ वॉडची विभागणी झाल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांची अपेक्षा बाळगून असलेले बरेच उमेदवार हिरमुस झाले आहेत. सोडत यश चरडे व सुमित चरडे या लहान मुलांनी चिठ्ठी काढून काढली.घोराड : सेलू नगरपंचायतचे प्रभाग निहाय आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. यात अकरा विद्यमान नगरसेवकांना दुसरे प्रभाग शोधावे लागणार आहे. सतरा सदस्य असलेल्या नगरसेवक पदाचे प्रभाग आरक्षणात नगरपंचायतचे उपाध्यक्ष अनिल काटोले, नगरसेवक व जिल्हा शिवसेना प्रमुख अनिल देवतारे, माजी नगराध्यक्ष राजेश जयस्वाल व माजी उपाध्यक्ष चूडामन हांडे, गट नेते व नगरसेवक शैलेंद्र दप्तरी या नेत्यांचे प्रभाग महिला राखीव झाले आहेत. तर नगरसेवक सनी खोडे, हिम्मत शहा, मनोरमा पराते, प्रेमिला जगताप, वंदना कळसाईत, जोत्सना नंदेश्वर यांना आरक्षण सोडतीमुळे दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. तर नगराध्यक्ष शारदा माहूरे, नगरसेवक वैशाली पाटील, लक्ष्मी डोंगरे, शैला शबिर शहा, सावित्री उइके, कल्पना कारवटकर या नगरसेवकांना आपल्याच प्रभागमध्ये निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. आरक्षणाच्या सोडतीमुळे नगरसेवकांमध्ये कुठे खुशी तर कुठे गम अशी परिस्थिती आढळून येत आहे. आरक्षणाची सोडत उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार महेंद्र सोनवणे, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रभाग क्रमांक १६ अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जमाती स्त्री राखीव, प्रभाग क्रमांक १६ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १,२,७ ना.मा.प्र. महिला राखीव, प्रभाग क्रमांक ११, १७ ना.मा.प्र. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३,५,८,१२ (खुला) सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक ४,६,९,१०,१४ खुला महिला राखीव असे आरक्षण निघाले.उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडतल्ल लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : समुद्रपूर येथे आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी प्रविण नेहारे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी स्वालिना मालगावे यांची उपस्थिती होती. वॉर्ड क्रमांक १ अनुसूचित जाती महिला, वॉर्ड क्रमांक २ अनुसूचित जमाती महिला, वॉर्ड क्रमांक ३ नामाप्र सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ४ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ५ नामाप्र सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ६ अनुसूचित जाती, वॉर्ड क्रमांक ७ नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक ८ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ९ नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक १० नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक ११ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक १२ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक १३ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक १४ अनुसूचित जमाती, वॉर्ड क्रमांक १५ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक १६ अनुसूचित जमाती आणि वॉर्ड क्रमांक १७ अनुसूचित जाती महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सोडत काढतेवेळी नगराध्यक्ष गजानन राऊत, विरोधी पक्षनेते मधुकर कामडी, नगरसेवक आशीष अंड्रस्कर, प्रा. मेघश्याम ठाकरे आदींची उपस्थिती होती. समुद्रपूर नगरपंचायतीवर सध्यास्थितीत भाजपची सत्ता आहे, हे विशेष.