शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ इसमाच्या मृत्यूचे रहस्य कायमच

By admin | Updated: February 5, 2017 00:32 IST

तालुक्यातील सेवा-तांबारी शिवारात आळलेल्या त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही.

पोलिसांकडून घटनास्थळाचे पुन्हा अवलोकन समुद्रपूर : तालुक्यातील सेवा-तांबारी शिवारात आळलेल्या त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. यामुळे त्याच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह ठाणेदारांनी घटनास्थळाचे पुन्हा अवलोकन केले. यात त्यांच्या हाती काय आले, याची माहिती देण्यास मात्र पोलिसांकडून नकार देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे. शुक्रवारी आढळलेला मृतदेह कुजलेला असून त्याच्या हातापायाचे पंजे नसल्याचे दिसून आले. यामुळे सदर इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह येथे टाकण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, समुद्रपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. सदर प्रकरणी माहिती घेण्यासाठी तपासी अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्याच काही बोलणे शक्य नसल्याचे सांगितले. सध्या मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. लवकरच या प्रकरणातील रहस्याचा उलगडा होऊन वास्तव बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले. तपासाकरिता समद्रपूर पोलिसांनी आसपासच्या परिसरात चौकशी सुरू केली आहे. यात लवकरच यश येवून प्रकरणाचा खुलासा होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.(तालुका प्रतिनिधी)