शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
3
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
4
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
5
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
6
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
7
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
8
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
9
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
10
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
11
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
12
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
13
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
14
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
15
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
16
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
17
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
18
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
19
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
20
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

शिक्षकांच्या मागण्यांकरिता लढणे हे माझे कर्तव्य

By admin | Updated: February 15, 2016 02:19 IST

शिक्षकांच्या मागण्या मान्य करून घेणे, ही माझी बांधिलकी आहे. त्यासाठी आपण पूर्ण ताकदीसह लढा देत आहे.

नागो गाणार : शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने शिक्षक मेळावा व तक्रार निवारण सभावर्धा : शिक्षकांच्या मागण्या मान्य करून घेणे, ही माझी बांधिलकी आहे. त्यासाठी आपण पूर्ण ताकदीसह लढा देत आहे. शिक्षकांच्या मागण्यांकरिता लढणे हे माझे कर्तव्यच आहे, असे मत शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले. शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने शिक्षक मेळावा व तक्रार निवारण सभा धुनिवाले मठ येथे घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते आ.डॉ. पंकज भोयर, जि.प. सदस्य मनोज चांदुरकर, विनोद पांढरे, पूजा चौधरी, बाबाराव देशमुख, नरेंद्र थुटे, सुभाष गोतमारे, मनोहर वाके, रमेश टपाले, बळीराम चव्हाण, अजय भोयर, अनिल टोपले आदी उपस्थित होते. आ. गाणार सारख्या व्यक्तीची शिक्षण क्षेत्राला नितांत गरज आहे. आपण त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहू, असे मत खा. तडस यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सहकार्य करेल, असे मत आ.डॉ. भोयर यांनी व्यक्त केले. राज्यात मराठी शाळा टिकविणे शासनाची जबाबदारी आहे. मराठी शाळाबाबत शासनाने व्यवहाराची भाषा करणे योग्य नाही, असे मत तक्रार निवारण समितीचे कार्यवाह अजय भोयर यांनी व्यक्त केले.यावेळी माधूरी काळे, डॉ. रवींद्र घुगे, नीता मडावी, सुनील चिडाम, राजेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रात शिक्षकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष रमेश टपाले यांनी तर अहवाल वाचन भोयर यांनी केले. संचालन दत्ता भांगे यांनी केले तर आभार अनिल टोपले व पुंडलिक नागतोडे यांनी मानले. कार्यक्रमाला राजेंद्र तिरभाने, विनय बुरघाटे, राजू कारवटकर, विजय देशमुख, प्रकाश गांडोळे, देविदास गावंडे, सुनील गायकवाड, देविदास इंगोले, मदन बजाज, पुंडलिक नाकतोडे, रवींद्र जाने आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)शिक्षकांच्या समस्या केंद्रात मांडणार; खासदारांची ग्वाहीशिक्षक मेळावा व तक्रार निवारण सभेमध्ये जिल्ह्यातील शिक्षकांनी त्यांना येत असलेल्या विविध समस्यांचा पाढाच उपस्थित मान्यवरांसमोर वाचला. या समस्या सोडविण्याची मागणीही शिक्षकांकडून करण्यात आली. शिवाय शासनाकडून येत असलेल्या विविध अडचणी सोडविण्याकरिता जिल्ह्याचे खासदार व वर्धा विभागाच्या आमदारांनी पाऊल उचलण्याची मागणीही शिक्षकांकडून करण्यात आली. यावेळी खा. तडस यांनी शिक्षकांच्या समस्या केंद्रात मांडण्याचे आश्वासन दिले. मराठी शाळांच्या बचावाकरिता शिक्षकांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. केवळ शासनाकडे बोट दाखवून चालणार नाही तर याकरिता प्रत्येक शिक्षकाने कार्य करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मेळाव्यात व्यक्त केले.