शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संगीत साधना ईश्वर आराधनेचं श्रेष्ठ माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:18 IST

संगीत लहरी स्पंदनाकडून चेतनेकडे या सुश्राव्य शास्त्रीय संगीत मैफिलीत कर्णतृप्तीसह आत्मिक संवाद साधताना सुरमणी आशिष साबळे यांनी अनेक वर्तमान दाखले देत आधुनिक जीवन शैलीवर भाष्य केले.

ठळक मुद्देआशिष साबळे : वैद्यकीय जनजागृती मंच व द इव्हेंट्सचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संगीत लहरी स्पंदनाकडून चेतनेकडे या सुश्राव्य शास्त्रीय संगीत मैफिलीत कर्णतृप्तीसह आत्मिक संवाद साधताना सुरमणी आशिष साबळे यांनी अनेक वर्तमान दाखले देत आधुनिक जीवन शैलीवर भाष्य केले. संगीत साधना हीच प्रत्येक जीवात्म्याचा परतत्त्वासोबत संवाद साधण्याच श्रेष्ठ माध्यम असून प्रत्येकाने स्वत:तील ईश्वरी गुणांना प्रगट केले तरच खºया अर्थाने संत श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला असे समजावे असे सूचक निर्देश सुरमणी आशिष साबळे यांनी दिले.वैद्यकीय जनजागृती मंच व इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉटर कप स्पर्धेतील ग्राम तथा सामाजिक संस्थांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. विविध रागदारीसह सुपरिचित अभंग आणि भजन गायनाने मैफिलीत रंगत निर्माण झाली आणि भैरवीने सांगता झाली. या मैफिलीच्या निमित्ताने विज्ञान आणि अध्यात्माचा सुरेख सहसंबंध उपस्थितांनी अनुभवला.प्रारंभी वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी आयोजनाची भुमिका मांडली. आगामी वॉटर कप स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील चार तालुके सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला आ. डॉ. पंकज भोयर, डॉ. उल्हास जाजू, अभ्युदय मेघे आणि चिन्मय फुटाणे, डॉ अरुण पावडे मंचावर उपस्थित होते. आर्वी तालुक्यातील काकडदरा, पिंपळगाव भोसले, बोथली (नटाळा), नेरी (मिरझापुर), माळेगाव -ठेका, सावध (हेटी) , पिंपळखुटा, विरुळ आणि सावंगी (पोळ) या गावांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. पाणी फाउंडेशनचे विदर्भ विभाग समनव्यक चिन्मय फुटाणे यांनी आगामी वॉटर कप स्पर्धेबद्दल माहिती दिली.विविध सामाजिक संघटनाचा देखील सन्मान स्मृतीचिन्ह देवून करण्यात आला. हा सत्कार सुरेश पावडे, राजेंद्र गरपाल, नानासाहेब कराळे, डॉ अरुण पावडे, डॉ. अशोक पावडे, डॉ प्रतिभा पावडे, कोकिळा पावडे, श्रीमती मालुताई पावडे, नलिनी गरपाल, आशा कराळे, प्रभाकर राऊत आणि श्याम भेंडे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमात वर्धा, यवतमाळ आणि आर्वी येथील ४० सामाजिक संस्था आणि निमंत्रिक वर्धेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातून जवळपास १२०० लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले तर त्यांच्या सोबत अशोक पावडे आणि मंदार देशपांडे यांनी सन्मान सोहळ्यातील संघटनाची उद्घोषणा केली. संगीत मैफिलीचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत वाडीभस्मे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शैलेंद्र कराळे यांनी मानले.