शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीकरिता पालिका वाजविते बॅण्ड

By admin | Updated: March 7, 2017 01:13 IST

थकीत मालमत्ता कर वसुलीकरिता पालिकेच्यावतीने विविध उपायोजना राबविण्यात आल्या; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.

एकाच दिवसात पाऊणलाखाची वसुलीवर्धा : थकीत मालमत्ता कर वसुलीकरिता पालिकेच्यावतीने विविध उपायोजना राबविण्यात आल्या; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. यामुळे पालिकेच्यावतीने थकबाकीदाराच्या घरासमोर किंवा त्याच्या प्रतिष्ठानासमोर बॅण्ड वाजविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याचा परिणाम होत असून थकबाकीदार थेट तिथेचे आलेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम देत आहेत. सोमवारी राबविलेल्या या उपक्रमात दुपारपर्यंत एकूण पाऊणलाख रुपयांचा कर जमा झाल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. शहरातील अनेकांकडे मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपये थकले आहे. या थकबाकीच्या वसुलीकरिता त्यांना नोटीसी बजावल्या, अनेक करदात्यांची मालमत्ता सिलही केली. असे असतानाही अनेकांकडून थकीत करावा भरणा झाला नाही. परिणामी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी करदात्यांच्या घरांसमोर जात बॅण्ड वाजविण्याचा उपक्रम सुरू केला. याचा लाभही होताना दिसून येत आहे. आज पालिकेचे कर वसुलीपथक आर्वी मार्गावरील थकबाकीदार सुभाष रामचंद्र मुडे यांनी २० हजार १७८ तर सुरेश जोशी आणि शांता नरड यांनीही बँड नका वाजवू थकबाकीची रक्कम घेवून जा म्हणत ५१ हजार ८९९ रुपयांचा धनादेश कर्मचाऱ्यांच्या हवाली केला आहे. कार्यवाहीच्यावेळी पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अजय बागरे यांच्यासह गजानन पेटकर, विजय किनगावकर, स्वप्नील खंडारे, अविनाश मरघडे, दिलीप कुथे, अमोल कोडापे यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी) थकबाकीदरांच्या घरासमोर बॅण्ड वाजविण्याची योजना या मोहिमेच्या प्रारंभीच राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु कर्मचाऱ्यांकडून हा प्रकार टाळावा असे सांगण्यात आले होते. मात्र थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर हा मार्ग स्वीकरण्याचा निर्णय घेण्यात आला. - अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, वर्धा.