शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील हॉटेल्सवर पालिकेची वक्रदृष्टी

By admin | Updated: January 11, 2017 00:55 IST

शहरातील बऱ्याच हॉटेल्सकडून त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकण्यात येते.

दोन हॉटेल्सला सात हजारांचा दंड : नियमांना बगल देणे भोवले वर्धा : शहरातील बऱ्याच हॉटेल्सकडून त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकण्यात येते. त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची ओरड झाल्याने पालिकेच्यावतीने अशा हॉटेल्स मालकांना नोटीसी बजावणे सुरू केले आहे. शिवाय त्यांच्या हॉटेल्सची तपासणी करण्याची धडक मोहिमही राबविण्यात येत आहे. याकरिता पालिकेच्यावतीने एक पथक तयार करण्यात आले असून त्यांच्याकडून कारवाई करणे सुरू झाले आहे. शहरातील बरेच हॉटेल्स रात्री सुरू राहत असल्याने हे पथक याच काळात हॉटेल्सची तपासणी करणार असल्याचे समजते. या निर्णयानुसार या पथाकाने सोमवारी रात्री वर्धेत हॉटेल सालसा व सावजी या दोन ठिकाणी अचानक धडक दिली. या धडकेत दोनही हॉटेल्समध्ये अनेक त्रुट्या असल्याचे दिसून आले. या दोन्ही हॉटेल्स चालकांकडे पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले. शिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही नव्हते. या व्यतिरिक्त दोन्ही हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना व येथे अन्न शिजविण्याकरिता असलेल्या पाण्याबाबत आवश्यक स्वच्छता नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे या हॉटेल्स मालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. यातील हॉटेल सालसाला पाच हजार रुपये तर हॉटेल सावजीच्या संचालकाला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. वर्धा शहरातील इतर हॉटेल्सची तपासणी करण्याकरिता पालिकेने सात कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. हे पथक रात्री ८ वाजताच्या सुमारास या कामाला निघणार आहे. दिवसभर पालिकेतील कामे आटोपून सायंकाळी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. या काळात वर्धेतील सर्वच हॉटेल्सची तपासणी होणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी) पालिकेची सात कर्मचाऱ्यांची चमू तयार हॉटल मालकांकडून होत असलेल्या अनागोंदीमुळे शहरात वाढत असलेल्या अस्वच्छतेवर आळा घालण्याकरिता पालिकेच्यावतीने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून सात कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे कारवाई करणे सुरू झाले आहे. या पथकाला मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे यांचे मार्गदर्शन असून त्यात प्रशासकीय अघिकारी अजय बागरे, अशोक ठाकूर, चंद्रकांत देव, राजू निखाडे, संदीप नाहारकर, सुमित भोसले, विशाल सोमवंशी यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोजच प्रत्येक हॉटलमध्ये कारवाई करण्यात येणार आहे.