शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

२७२ एकरांवर तुतीची लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:58 IST

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणारी आहे, असे कृषितज्ज्ञ सांगतात. दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. यंदा जिल्ह्यात २७२ एकर शेतजमिनीवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेशीम शेतीत वर्धा तालुका अव्वल तर सेलू द्वितीय स्थानी

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणारी आहे, असे कृषितज्ज्ञ सांगतात. दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. यंदा जिल्ह्यात २७२ एकर शेतजमिनीवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेती करण्यात जिल्ह्यात वर्धा तालुका अव्वल असून सेलू तालुका द्वितीय स्थानी असल्याचे सांगण्यात आले.वर्धा जिल्ह्यात एकूण ४७८ रेशीम कोश प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ३५३ उद्योग हे स्वत: शेतकरीच चालवितात. ३५३ शेतकऱ्यांकडून केल्या जात असलेल्या रेशीम शेतीमुळे सुमारे २ हजार ९० गरजूंना रोजगार मिळत आहे. पारंपरिक शेती ही न परवडणारी असल्याचे लक्षात आल्यावर सदर कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनात रेशीम शेतीकडे वळल्याचे सांगण्यात येते.रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शासन मनरेगाअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान देते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड होऊन शेतकरी सक्षम व्हावा, यासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनीही रेशीम शेती करावी, यासाठी संबंधित विभागाच्यावतीने प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.१०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्यरेशीम शेती करू इच्छिणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याला मनरेगाअंतर्गत एकरी २ लाख ९२ हजार ६२५ रुपयांचे अर्थसहाय्य १०० टक्के अनुदानावर दिले जाते. इतकेच नव्हे, तर एससी, एसटी व एनटी तसेच महिला कुटुंब प्रमुख प्रवर्गातील शेतकऱ्याला जमिनीची मर्यादेची अट वगळता एकरी तितकेच अर्थसहाय्य केले जाते. शेतकऱ्याने तीन वर्षांपर्यंत तुतीची जोपासना करीत भरघोस उत्पन्न घ्यावे, हा शासकीय अनुदान देण्यामागील मुख्य उद्देश आहे.उद्योगावर उपराजधानीत होते शिक्कामोर्तबरेशीम कोश प्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भातील प्रस्ताव वर्धेत जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयात स्वीकारले जात असले तरी प्राप्त आवेदन मंजुरीसाठी नागपूर येथील कार्यालयात पाठविले जातात. तेथेच त्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होते. यंदा प्राप्त झालेला एक प्रस्ताव उपराजधानीतील कार्यालयात पाठविण्यात आला होता. तर मागीलवर्षी एकही प्रस्ताव पाठविण्यात आला नव्हता.रेशीम धागा तयार करण्याचा उद्योग नाचणगावातजिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने रेशीम शेतीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी १५ ते २९ डिसेंबर हा कालावधी जनजागृती पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या कालावधीत शेतकऱ्याना रेशीम शेतीचे फायदे पटवून देण्यात येतात. असे असले तरी थेट रेशीम धागा तयार करण्याचा एकमेव उद्योग देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे असल्याचे सांगण्यात आले.गुणवंत कुचेवार यांचा प्रस्ताव फेटाळलायंदाच्या वर्षी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाला गुणवंत कुचेवार नामक तरुणाचा रेशीम कोश प्रक्रिया उद्योगासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाला होता. तो कार्यालयाने नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला. परंतु, हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात एकूण ४७८ रेशीम कोश प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ३५३ उद्योग हे स्वत: शेतकरीच चालवितात. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत २७२ एकरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य केले जाते. मागील वर्षी रेशीम कोश प्रक्रिया उद्योगासंदर्भात एकही प्रस्ताव प्राप्त झाला नव्हता. यंदा कुचेवार यांचा प्रस्ताव आला होता. तो नामंजूर झाला आहे.- प्यारेसिंग पाडवी,रेशीम विकास अधिकारी, वर्धा.