शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 45 ते 60 वयोगटातील म्युकरमायकोसिस बाधित जादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

साधारणत: नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक किंवा डोळ्यांना इजा पोहोचवितो. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभाेवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे आढळलेल्या व्यक्तीने तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घेणे क्रमप्राप्त आहे.

ठळक मुद्देएकाचा घेतला बळी : १९ रुग्णांना मिळाली रुग्णालयातून सुटी

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडची पहिली आणि दुसरी लाट निवळली असली तरी सध्या म्युकरमायकोसिस हा आजार सध्या डोके वर काढू पाहात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे तब्बल ८१ रुग्ण ट्रेस झाले असून, या आजाराने एकाचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३९ बाधित हे ४५ ते ६० वयोगटातील आहेत. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. बुरशीजन्य संसर्ग असलेला म्युकरमायकोसिस हा प्रामुख्याने मधुमेह, वयोवृद्ध तसेच पूर्वीच विविध आजार असलेल्यांना होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी हा आजार जीवघेणा ठरणाराच आहे. त्यामुळे कोविड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण हे सध्या आरोग्य विभागासाठी मोठे आव्हान ठरू पाहात आहे. साधारणत: नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक किंवा डोळ्यांना इजा पोहोचवितो. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभाेवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे आढळलेल्या व्यक्तीने तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घेणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८१ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली असून, त्यापैकी १९ व्यक्तिंना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या ६१ व्यक्तींवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिस बाधितांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात आहेत.  

सर्वाधिक मधुमेहींनाच कवेत घेतोय म्युकरमायकोसिसजिल्ह्यातील ८१ म्युकरमायकोसिस बाधितांमध्ये मधुमेह असलेल्या ६८, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले २८, तर दीर्घकालीन आजार असलेल्या २९ व्यक्तिंचा समावेश असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

५६ व्यक्तींना द्यावा लागला होता प्राणवायूजिल्ह्यात आतापर्यंत ८१ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली असून, त्यापैकी ५६ व्यक्तिंना या आजाराची लागण होण्यापूर्वी प्राणवायू द्यावा लागला होता. उर्वरित २५ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला नव्हता, अशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे कोविडमुक्त झालेल्या प्रत्येक रुग्णाने अधिकची दक्षता घेणे गरजेचे आहे.

३८ रुग्णांना द्यावे लागले होते स्टेरॉईड- कोविडचा संसर्ग झाल्याने गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी स्टेरॉईड दिले जाते. अशाच ३८ रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे निदान झाले आहे. असे असले तरी उर्वरित ४३ म्युकरमायकोसिस बाधितांची स्टेराॅईड थेअरपीबाबतची हिस्ट्री  नाही. परंतु, त्यांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे पुढे आले आहे.

कोविडमुक्त नाहीत; पण तीन व्यक्तींना झाली म्युकरची लागण- ८१ म्युकरमायकोसिस बाधितांपैकी ७८ व्यक्तिंना यापूर्वी कोविडचा संसर्ग झाला होता, तर तीन व्यक्तिंना कोविडचा संसर्ग झाला नसला तरी त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने कोविडसोबतच म्युकरमायकोसिसबाबत दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

म्युकरमायकोसिस बाधितांत पुरुष सर्वाधिक- जिल्ह्यात आतापर्यंत ८१ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात ६२ पुरुष, तर १९ महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एकूणच म्युकरमायकोसिस बाधितांमध्ये पुरुषच सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे पुरुषांनी सर्वाधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ८१ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून, १९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ६१ रुग्ण उपचार घेत आहेत.- डॉ. प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या