शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपासून एमटीडीसीला भाडे नाही

By admin | Updated: May 13, 2016 02:14 IST

हॉली डे रिसोर्टची संपूर्ण जागा ही महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट यांच्या मालकीची आहे. एमटीडीसीने ही जागा वर्धा हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ३० वर्षांकरिता....

वर्धा : हॉली डे रिसोर्टची संपूर्ण जागा ही महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट यांच्या मालकीची आहे. एमटीडीसीने ही जागा वर्धा हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ३० वर्षांकरिता भाडेतत्वावर दिली होती; परंतु गत २० वर्षांपासून कंपनीने एमटीडीसीला भाडे दिलेले नाही. त्यामुळे एमटीडीसीने २००२ मध्ये कंपनीची लीज रद्द केली. त्यानंतर सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट होते. जिल्हाधिकाऱ्यांनी एमटीडीसीच्या बाजूने निर्णय दिला. या आदेशाविरूद्ध वर्धा हॉटेल प्रा.लि. यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांच्या समक्ष अपिल दाखल केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांनी वर्धा हॉटेल प्रा.लि. यांची अपिल ३१ मार्च २०१६ रोजी खारिज केली. त्यानंतर एमटीडीसीचे क्षेत्रीय अधिकारी हनुमंत हेडे यांनी वर्धा हॉटेल प्रायवेट लिमिटेडची मालमत्ता सील केली. परंतु शिवसागर शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये ३० दुकान आहेत. सदर दुकाने हे वर्धा हॉटेल प्रा.लि.ने सबलीज मधून दिलेले होते. सर्व दुकानदार नियमितपणे त्यांचे भाडे भरत असताना २ मे २०१६ रोजी एमटीडीसीचे क्षेत्रीय अधिकारी हनुमंत हेडे यांनी सर्व दुकानदारांना धमकी देत सात दिवसात सर्व दुकान खाली करण्याचे आदेश दिले.यामुळे ३० दुकाने व प्रत्येक दुकानदाराच्या परिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सदर शिवसागर शॉपींग कॉम्प्लेक्समधील सर्र्व दुकानदारांनी एम.टी.डी.सी. जबरदस्तीने खाली करण्याचा प्रयत्नात असताना दुकाने वाचविण्याकरिता सर्वांनी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे धाव घेवून एम.टी.डी.सी व वर्धा हॉटेल प्रा.लि. यांच्या विरूद्ध याचिका दाखल केली. सर्र्व दुकानदारांतर्फे अ‍ॅड. समीर विश्वास सोहोनी, नागपूर यांनी युक्तीवाद केला. यावर १० मे २०१६ रोजी आदेश पारित झाला. सदर आदेशामध्ये सर्व दुकानदारांचा ताबा जैसे थे ठेवावा असे नमूद आहे. त्यामुळे सदर याचिकेसंदर्भात जोपर्यंत कोणताही पुढील आदेश पारित होत नाही, तोपर्यंत तरी दुकाने सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.(प्रतिनिधी)