शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

25 उद्योगांवर महावितरणची अखेर टाच; केली बत्ती गूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ होतील असा समज अनेकांना होता; पण महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्युत देयक माफ करण्याचा कुठलाही निर्णय शासनाकडून घेण्यात आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडचा जोर ओसरताच महावितरणकडून थकबाकी वसुलीच्या मोहिमेला गती दिली जात आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून वारंवार माहिती देऊनही थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल २५ औद्योगिक ग्राहकांचा महावितरणने विद्युत पुरवठाच खंडित केला आहे.मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ होतील असा समज अनेकांना होता; पण महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्युत देयक माफ करण्याचा कुठलाही निर्णय शासनाकडून घेण्यात आला नाही. असे असले तरी नवीन विद्युत धोरणानुसार थकबाकीदारांना काही सवलती महावितरणच्या वतीने देण्यात आल्या; पण या सवलतीची माहिती देत वारंवार विद्युत देयक अदा करण्यासाठी सांगूनही थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांवर आता महावितरणने धडक कारवाईच करण्यास सुरुवात केली आहे. विद्युत देयकाची थकबाकी न भरल्याचा ठपका ठेवून जानेवारी महिन्यात १७, तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत आठ औद्योगिक ग्राहकांचा विद्युत पुरवठाच खंडित करण्यात आला आहे. ही मोहीम आणखी काही दिवस अशीच सूरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

३.१३ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी होताहेत प्रयत्न-  जिल्ह्यात एकूण ४ हजार ४६९ औद्योगिक ग्राहक आहेत; पण या औद्योगिक ग्राहकांकडे अजूनही ३.१३ कोटींची विद्युत देयकापोटीची थकबाकी आहे. -  हीच थकबाकीची रक्कम वेळीच महावितरणला मिळावी या हेतूने जिल्ह्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून विशेष प्रयत्न होत आहेत.

२.५५ कोटींची झाली वसुलीधडक थकबाकी वसुली मोहिमेच्या माध्यमातून महावितरणने आतापर्यंत औद्योगिक ग्राहकांकडून विद्युत देयकापोटीची २.५५ कोटींची थकबाकी वसूल केली आहे. ही थकबाकी वसुली मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

थकबाकीदारांना नवीन विद्युत धोरणात काही सवलती देण्यात आल्या आहेत. याचा लाभ घेत थकबाकीदारांनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीची रक्कम वेळीच भरून महावितरणला सहकार्य करावे.- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.

 

टॅग्स :electricityवीज