शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे अडीच हजार मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:16 IST

ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे.

ठळक मुद्देग्राहकांना फटका : डिमांड भरले; पण प्रतीक्षा कायमच

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांना विचारले असता सारेच आलबेल असल्याचा दिखावा करीत आहे. परंतु, खºया अर्थाने ग्राहकांना मीटरअभावी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.राज्यभरात मागील काही महिन्यापासून केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन विद्युत जोडण्या देण्यात आल्या. तसेच जुनी इलेक्ट्रो-मेकॅनीकल मिटर व नादुरुस्त मिटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली; पण या मोहिमेंदरम्यान मिटरच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात महावितरण मागे पडले. परिणामी विद्युत जोडण्यांबाबत ग्राहकांकडून डिमांड भरल्यानंतरही मिटर उपलब्ध होऊ शकले नाही. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट विभागात जवळपास घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक उपयोगातील जवळपास २ हजार ५४७ मिटरची प्रतीक्षा कायम आहे. त्यापैकी तब्बल २ हजार १४० घरांमध्ये मिटर अभावी विद्युत पुरवठा पोहचू शकला नाही. नागरिकांना वेळेवर मिटर उपलब्ध न झाल्याने महावितरणच्याच कर्मचाºयांकडून ग्राहकांना चोरटा रस्ता दाखविला जात आहे. परिणामी ग्राहक पोलवरुन विद्युत चोरीचा पर्याय निवडत आहे. असाच प्रकार नुकताच घडलेल्या शहरातील एका घटनेवरुन चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे महावितरणच्या नियोजनशुन्यतेमुळे ग्राहकांवर विद्युत चोरीची वेळ आल्याची ओरड होत आहे.२ हजार ७३८ कृषीपंपाना मिळाले नाही मीटरशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून मागील त्याला कृषीपंपासाठी विद्युत जोडणी देण्याची घोषणा शासनाने केली. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ विद्यूत जोडणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही महावितरणला करण्यात आल्या होत्या; पण अधिकाऱ्यांनी फारसे कानावर घेतले नसल्याने हल्ली जिल्ह्यात २ हजार ७३८ शेतकºयांच्या कृषीपंपाना मिटरमुळे विद्युत मिळू शकली नाही. यामध्ये आर्वी विभागातील आर्वी, आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा व पुलगांव उपविभागत ७७६ मिटर पेंडींग आहे. हिंगणघाट विभागाच्या हिंगणघाट व समुदपूर उपविभागात १ हजार १७१ तर वर्धा विभागातील देवळी,सेलू व वर्धा उपविभागात ७०१ शेतकºयांना विद्युत मिटरची प्रतीक्षा आहे.आता मिटर उपलब्ध झाले आहे. जेथे कमतरता असेल त्यांनी मागणी केल्यानंतर मिटर उपलब्ध होईल. मिटर वापराबाबती प्रक्रियापूर्ण केल्याशिवाय मिटर वापरता येत नाही. त्यामुळे थोडा विलंब झाला आहे, हा काही फारसा मोठा विषय नाही.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा.