शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीवरून पाणी घेण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:10 IST

वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे यंदा पावसाभावी वाळवंट झाल्याने .....

ठळक मुद्देवणीत भीषण पाणी टंचाईचे सावट : नवरगाव धरण तळ गाठण्याच्या स्थितीत

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे यंदा पावसाभावी वाळवंट झाल्याने व निर्गुडा नदीच्या माध्यमातून वणी शहरापर्यंत पाणी पोहचविणारे नवरगाव धरण तळ गाठण्याच्या स्थितीत असल्याने वणी शहरावर भीषण पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.दरम्यान, या संकटावर मात करण्यासाठी वणी नगरपालिकास्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. वणी तालुक्यातील रांगणा गावाजवळून वाहणाºया वर्धा नदीच्या डोहातून वणी शहराची तहान भागविण्यासाठी पाणी घेतले जाणार आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून तसा ठरावही पालिकेने घेतला आहे. रांगणा ते वणीपर्यंत पाईप लाईन टाकण्यात येणार असून त्याचा खर्च आठ ते १२ कोटीपर्यंतच्या घरात आहे. हा निधी कोणत्या मार्गाने उपलब्ध करायचा, याचेही चिंतन पालिकास्तरावर सुरू आहे. यासोबतच वणी शहरासाठी स्वर्णजयंती योजनेअंतर्गत वर्धा नदीवर ८० कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्याही हालचाली सुरू असून या कामासाठीची निविदा ‘अपलोड’ करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. यासाठी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ना.हंसराज अहीर हेदेखील प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नवरगाव धरणात केवळ २८ टक्के जलसाठा असून तो अगदी काही महिने पुरेल ईतका आहे....तर उद्रेक होण्याची भीतीयंदा वणी उपविभागात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याने नदी, नाले, धरण कोरडे होण्याच्या स्थितीत आहेत. या पाणी टंचाईचा फटका वणी शहराला मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. आजच उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईच्या काळात पालिकेच्या नगरसेवकांसह पदाधिकाºयांना नागरिकांच्या उदे्रकाला सामोरे जावे लागणार आहे.येत्या डिसेंबरपर्यंत वर्धा नदीत पाईपलाईन टाकून पाणी घेण्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नवरगाव धरणातून पुन्हा दोन क्युबिक मीटर पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सोबतच शहरात नव्याने १३ ट्युबवेल तयार करण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.-तारेंद्र बोर्डेनगराध्यक्ष वणी.