शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती थुटेंच्या मृतदेहासह शिवसैनिकांचे आंदोलन

By admin | Updated: July 19, 2016 02:25 IST

जिल्हा परिषदेचे माजी सभापती छत्रपती थुटे यांचा शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान रविवारी नागपूर

समुद्रपूर : जिल्हा परिषदेचे माजी सभापती छत्रपती थुटे यांचा शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान रविवारी नागपूर येथे मृत्यू झाला. त्यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची चर्चा होती. सोमवारी दुपारी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अशोक शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी थुटे यांचा मृतदेह असलेली व्हॅन पोलीस ठाण्यासमोर उभी केली. त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी थुटे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले.छत्रपती थुटे यांच्या हत्येत सहभागी असलेल्यांचा पोलिसांना सुगावा लागला असून त्यांच्या मागावर ते असल्याचे सांगण्यात आले आहे. हत्येचा संशय गावातील काही इसमांवर असून त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होवू नये म्हणून पोलिसांकडून त्यांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती आहे. तत्पूर्वी शिवसैनिकांनी या प्रकरणातील हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीकरिता पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून, गिरड, वर्धा, वडनेर व स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शिवसेनेच्यावतीने मागणीचे एक निवेदन उपविभागीस पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांना देण्यात आले. घटनेमुळे समुद्रपूर व सावरखेड्यात तणावाचे वातावरण आहे. रविवारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती छत्रपती थुटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे नेले असता रविवारी मृत्यू झाला. सोमवारी सावरखेडा येथे अंत्यसंस्काराकरिता त्यांचा मृतदेह आणताना जिल्ह्यातील शिवसैनिक समुद्रपूर येथे मोठ्या संख्येत गोळा झाले होते. त्यांनी थुटे यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवला. यावेळी माजी आमदार अशोक शिंदे यांच्यासह शिवसौनिकांनी तिथेच रास्ता रोको केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच वर्धेवरून दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले. थुटे यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची शक्यता असल्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले. यावेळी शिंदे यांनी मध्यस्थी करून शिवसैनिकांना शांत केले. यावेळी तालुका प्रमुख रवींद्र लढी, प्रमोद भटे, सचिन गावंडे, प्रा. विलास बैलमारे, नारायण बादले, महादेव बैलमारे, विलास वैद्व, सनी निवटे यांच्यासह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार; गावात तणाव४तालुक्यातील सावरखेडा येथे छत्रपती थुटे यांचा मृतदेह आणण्यात आला. गावात तणावाचे वातावरण होते. यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंत्यसंस्काराच्यावेळी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले. यावेळी अशोक शिंदे, माजी आमदार राजू तिमांडे, अ‍ॅड. सुधीर कोठारी, हिम्मत चतुर, रमेश भोयर, अभय कोठारी, खुशाल लोहकरे, नितीन सरोदे यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते व हजारो शिवसैनिक उपस्थित होते.