शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

शिक्षकांचे बेमुदत शाळा कामकाज बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:39 IST

अनुदानाच्या मागणीसाठी राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनापासून शाळा कामकाज बंद आंदोलन पुकारले. मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमहिना लोटूनही अनुदान नाही : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनुदानाच्या मागणीसाठी राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनापासून शाळा कामकाज बंद आंदोलन पुकारले. मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी स्वीकारले. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनाही निवेदन देण्यात आले.राज्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांच्या मूल्यांकन निकषाची पूर्तता करून पात्र ठरलेल्या विना अनुदानित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शाळा व तुकड्या एकूण घोषित १४६ व अघोषित १६५६ व पुणे स्तरावरील संपूर्ण याद्या शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी १५ दिवसांत उपसमितीची बैठक घेऊन अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, महिना लोटूनही अनुदानास पात्र याद्या घोषित करण्यात आल्या नाहीत. अनुदानाविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही विषय घेण्यात आला नाही. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे. शिक्षकांनी ५ आॅगस्टला विभागीयस्तरावर आंदोलन करून १३ ला शाळा कामकाज बंद करण्याचा इशारा दिला होता.याला विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे सचिव सतीश जगताप यांनीही पाठिंबा दिला आहे. शाळा कामकाज बंद आंदोलनात जिल्ह्यातील विनाअनुदानित घोषित व अघोषित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभागी होत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला दिले.यावेळी कांचन ढेरे, सुनीता श्यामकुंवर कंचन मुंधडा, विद्या चांभारे, जयश्री राऊत, गजानन गुडधे, प्रा. भजभुजे, प्रा. मुडे, प्रा. बेले, प्रा. बावणे, प्रा. आडे, प्रा. राऊत, प्रा. बैसारे, प्रा. कोसुरकर, प्रा. पाल, प्रा. चतुर, विशाल सबाने यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षक