शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीच्या चाब्या घेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:56 IST

मानधन वाढीचे आश्वासन शासनाने पाळले नसल्याने अंगणवाडी सेविकांनी राज्यपातळीवर बेमुदत संप पुकारला आहे.

ठळक मुद्देजिल्हाकचेरीसमोर ठिय्या : कृती समिती आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मानधन वाढीचे आश्वासन शासनाने पाळले नसल्याने अंगणवाडी सेविकांनी राज्यपातळीवर बेमुदत संप पुकारला आहे. या संपाची दखल घेत शासनाने मानधन वाढीचा निर्णय घेतला; पण हा निर्णय मान्य नसल्याचे म्हणत अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीने हा संप सुरूच ठेवला. यात सोमवारी वर्धेत अंगणवाडी सेविकांनी अंगणवाड्यांच्या चाब्या ताब्यात घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.शासनाचे बाल संस्कार केंद्र म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील महिलांना व मुलांना आरोग्याचे मार्गदर्शनही याच केंद्रातून करण्यात येत आहे. असे असताना येथे काम करणाºया महिलांना मिळणारे मानधन तोकडे असल्याचे म्हणत त्यांनपी संप पुकारला. या संपाला आता दोन आठवड्याचा कालावधी होत आहे. त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अंगणवाडी समितीच्या सदस्यांकडून होत आहे.शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केले जाते. जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांना पोषण आहाराच्या साहित्याचा पुरवठा गत काही महिन्यांपासून शासनाने केलेला नाही. बचत गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जात आहे. केंद्र व राज्य सरकारची ग्रामीण भागातील नागरिकांशी नाळ जुळवून देणाºया सदर अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या गत काही वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्यांच्याकडून अल्प मोबदल्यावर विविध कामे करून घेतली जातात. अंगणवाडी सेविकांना केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाºयांप्रमाणे सर्व सोई-सुविधा देऊन त्यांच्या मानधनात समाधानकारक वाढ करण्यात यावी या मुख्य मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन सदर आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. विविध मागण्यांची सोडवणूक होईस्तोवर केंद्राची चाबी देण्यात येणार नाही, असेही निवेदनातून संबंधीतांना कळविण्यात आले आहे.या आंदोलनाचे नेतृत्त्व दिलीप उटाणे, विजया पावडे, मैना उईके, मंगला उईके, वंदना कोळणकर, अस्लम पठाण यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.