शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बेदम मारहाणीतूनच झाला मोतीरामचा मृत्यू

By admin | Updated: May 10, 2014 00:27 IST

पुलगाव तालुक्यातील रसुलाबाद येथील मोतीराम पंजाब मेश्राम यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्ससंस्कारही करण्यात आले.

 वर्धा : पुलगाव तालुक्यातील रसुलाबाद येथील मोतीराम पंजाब मेश्राम यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्ससंस्कारही करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गावातील काही लोकांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाचा मुलगा आकाश मेश्राम याने केला आहे. या आरोपाचे निवेदन त्यांने पुूलगाव पोलिसांना दिले असून मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. निवेदनात असलेल्या माहितीनुसार, रसुलाबाद येथील मोतीराम मेश्राम यांचा २४ एप्रिल २०१४ ला मृत्यू झाला. गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर गावातील अनेकांनी तुझ्या वडिलांना बेदम मारहाण झाल्यानेच त्यांचा जीव गेला, अशी माहिती आकाशला दिली. २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास गावातील सहा जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली, यातच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी मी गावातील रामभाऊ तांबे यांच्याकडील लग्नसमारंभात होतो. रात्री १० वाजता मी घरी परत आलो. माझ्या वडिलांनी मला या लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. परंतु, किरकोळ मारहाण झाली असे समजून मी उद्या जे काही करायचे ते करू, असे सांगून त्यांची समजूत काढली. दुसर्‍या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, असे निवेदनात म्हटले आहे. संशय असल्यामुळे माझ्या वडिलांना मी अग्नी दिला नाही, त्यांचा मृतदेह पुरला. आरोपींनी माझ्या वडिलांच्या गुप्तांगावर, छाती, पोटावर मारहाण केल्याने त्यांना गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा आरोपही केला आहे. वडिलांच्या मृत्यूची चौकशी करावी, साक्षीदारांच्या साक्षी नोंदवाव्या आणि पुरण्यात आलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे, अशी मागणी आकाश मेश्राम याने निवदेनातून केली आहे. त्यांनी पोलिसात दिलेल्या निवदेनावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)