शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हाकेच्या अंतरावर आई; पण भेट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:59 IST

बिबट्याच्या बछड्यावर करूणाश्रमात उपचार केल्यानंतर ठणठणीत बरा झाल्याने त्याची मातेसोबत भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. बछड्याला घेवून वनाधिकारी व कर्मचारी मूळ ठिकाणी बसले; पण बिबट मादी इकडे फिरकली नाही.

ठळक मुद्देबिबट्याच्या मादीपासून बछड्याची ताटातूट

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली: बिबट्याच्या बछड्यावर करूणाश्रमात उपचार केल्यानंतर ठणठणीत बरा झाल्याने त्याची मातेसोबत भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. बछड्याला घेवून वनाधिकारी व कर्मचारी मूळ ठिकाणी बसले; पण बिबट मादी इकडे फिरकली नाही. ती बाजूच्या शेतात इतर बछड्यांसोबत अनेकांना दिसली. हाकेच्या अंतरावर असूनही या बछड्याची त्याच्या आईसोबतची भेट टळली.हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्रातील मदनी शिवारातील शंकर विठोबा दिघडे यांच्या शेतात एक महिन्याचे बिबटाचे पिल्लू आढळून आले होते. त्यांची शारीरिक तपासणी केली असता त्याच्या पायाला जखम होती व ताप होता. त्यामुळे त्याला करूणाश्रमात ठेवण्यात आले होते.पिल्लू नजरेआड झाल्याने बिबट सैरभैर झाली असून काल तिने अनेकांना दर्शन दिले. रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, क्षेत्र सहाय्यक के.एस. वाटकर, अरुण मरकाम हे पिल्लाला सोबत घेवून शंकर दिघडे यांच्या शेतात बसले; पण बिबट मादी तिकडे भटकली नाही. त्याचवेळी ती पुष्पा माधव शिंदे यांच्या शेतात पिलासोबत अभिषेक व समाधान नेहारे या भावंडांना दिसली.आणखी दोन वेळा होणार प्रयत्नशिंदे व दिघडे यांंचे शेत एकमेकांच्या शेतापासून हाकेच्या अंतरावर आहे. कापून ठेवलेले चारापिक चारचाकी वाहनात भरण्याकरिता अभिषेक व समाधान नेहारे हे शेतात गेले तेव्हा पहाटेचे ४ वाजले होते. बिबट्याचे पिल्लू वाहनाच्या भोवती लाईटच्या उजेडात फिरत होते. तर बिबट मादी काही अंतरावर उभी होती, असे सांगण्यात आले. बिबट आणि बछड्याच्या भेटीचे प्रयत्न दोन वेळा होईल. यात भेट झाली नाही तर त्याला नागपूर येथील गोरवाडा येथे पाठविण्यात येईल, अशी माहिती वनविभागाने दिली.