लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अज्ञात इसमांनी आईसह एका मुलाचा खून केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निमगव्हाण येथे गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जनाबाई निळकंठ राऊत (६५) व सुरेंद्र निळकंठ राऊत (३०) अशी मृतांची नावे आहेत.सुरेंद्र नीळकंठ राऊत हा मागील अनेक दिवसांपासून वाळू तस्करांच्या विरोधात तक्रारी करायचा. तसेच तो माहिती कायद्याअंतर्गत अर्जही दाखल करायचा. त्यामुळे त्याचे गावातीलच काहीशी वाद होते. सुरेंद्र नीळकंठ राऊत आणि त्याची आई जनाबाई नीळकंठ राऊत हे दोघे शेतातून दुचाकीने जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला,, निळकंठ आणि जनाबाई या दोघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले दोघांच्याही डोक्यावर आणि शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. दोघांनाही शेताच्या धुºयावर फेकून देण्यात आले, ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली, त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. फुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दोन्ही मृतदेहाचा पंचनामा केला. आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी तसे तज्ञ श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांनी भेट दिली.
वर्धा जिल्ह्यात मुलासह आईची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:56 IST
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अज्ञात इसमांनी आईसह एका मुलाचा खून केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निमगव्हाण येथे गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
वर्धा जिल्ह्यात मुलासह आईची हत्या
ठळक मुद्देदुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ