शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात आई ठार, मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:51 IST

मुलीला नागपूर येथे फार्मसी महाविद्यालयात पोहोचवून परतीच्या प्रवासावर असलेल्या येथील आॅप्टीकल व्यावसायिकाच्या कारला वर्धा जिल्ह्यातील भिडीजवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला.

ठळक मुद्देवर्ध्याजवळची घटना

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : मुलीला नागपूर येथे फार्मसी महाविद्यालयात पोहोचवून परतीच्या प्रवासावर असलेल्या येथील आॅप्टीकल व्यावसायिकाच्या कारला वर्धा जिल्ह्यातील भिडीजवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. यात आई ठार तर मुलगा जखमी झाला. या भीषण अपघातात कारची एअर बॅग वेळेवर उघडल्याने मुलगा वाचला.निता महेश शर्मा (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर राहुल महेश शर्मा (२२) असे जखमी मुलाचे नाव आहे. यवतमाळ येथील प्रसिद्ध महेश आॅप्टीकलचे संचालक महेश शर्मा यांची मुलगी रोशनी हिचा नागपूरच्या फार्मसी महाविद्यालयात प्रवेश झाला होता. बुधवारपासून महाविद्यालय सुरू होणार असल्याने शर्मा परिवार तिला सोडण्यासाठी मंगळवारी दुपारी नागपूर येथे गेला होता. रोशनीला नागपुरात सोडून परतीच्या प्रवासात असताना वर्धा जिल्ह्यातील भिडीजवळ मंगळवारी रात्री ९.३० वाजता कार अचानक एका पुलावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, पुलाचे कठडे तोडून कार पुन्हा नागपूरच्या दिशेने वळली. या अपघातात निता शर्मा आणि त्यांचा मुलगा राहुल गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी रात्री ११.३० वाजता निता शर्मा यांना मृत घोषित केले. तर राहुलच्या डोक्याला दुखापत झाली. विशेष म्हणजे कारमधील एअर बलून वेळेवर उघडल्याने राहुल सुदैवाने वाचला.वर्धा येथे शवविच्छेदन झाल्यानंतर नीता शर्मा यांचा मृतदेह यवतमाळात आणण्यात आला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवळी (जि. वर्धा) पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.