शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईने केले मुलाला पोलिसांच्या स्वाधीन

By admin | Updated: August 30, 2014 23:57 IST

मांडवा येथील लॅन्को कंपनीत झालेल्या चोरी प्रकरणातील फरार आरोपी प्रविण वाघाडे सिद्धार्थनगर, वर्धा याला त्याच्या आईने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीजवळून दोन एलसीडी व

लॅन्को चोरीप्रकरण : दोन एलसीडी व एक फ्रिज जप्तआकोली : मांडवा येथील लॅन्को कंपनीत झालेल्या चोरी प्रकरणातील फरार आरोपी प्रविण वाघाडे सिद्धार्थनगर, वर्धा याला त्याच्या आईने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीजवळून दोन एलसीडी व एक फ्रिज जप्त केला आहे. सुरक्षा रक्षकांच्या संपकाळात लॅन्को कंपनीतून सात एलसीडी व चार फ्रिज असा एकूण ७८ हजार रुपयांची चोरी झाली होती. ठाणेदार प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार वसंत इंगोले व रवी जुगनाके चोरीचा छडा लावून नऊ आरोपींना अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपीकडून चार एलसीडी व दोन फ्रिज जप्त केले होते. तपासात प्रवीण वाघाडे हा आरोपीसुद्धा चोरीस सहभागी असल्याचे पुढे आले होते. त्याचा शोध सुरू असताना तो पोलिसांना गुंगारा देत होता. इतर आरोपी फरार असल्याने यात नेमके किती आरोपी होते याचा अंदाज अद्यापही पोलिसांनी आलेला नाही. अशात माहितीत असलेल्या वाघाडे याच्या शोधात पोलीस फिरत असताना फरार आरोपीच्या आईने त्याला आंजी(मोठी) पोलिसांच्या हवाली केले. त्याची पोलीस कोठडी घेवून विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली व घरात लपवून ठेवलेल्या दोन एलसीडी व एक फ्रिज पोलिसांना काढून दिला.यात आतापर्यंत सात एलसीडी पैकी सहा एलसीडी व चार पैकी तीन फ्रिज आरोपींकडून जप्त करण्यात आले असून एक फ्रिज व एलसीडी जप्त होणे शिल्लक आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.(वार्ताहर)