शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडीत वाढली मॉर्निंग वॉकची क्रेझ

By admin | Updated: December 27, 2014 22:57 IST

धावपळीच्या जीवनात आरोग्य तंदुरुस्त राहावे, यासाठी पहाटे उठून रस्त्यावरुन जलदगतीने चालणे, यासारखा दुसरा व्यायाम नाही. यामुळे रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होऊन काम करण्यासाठी दिवसभर

वर्धा : धावपळीच्या जीवनात आरोग्य तंदुरुस्त राहावे, यासाठी पहाटे उठून रस्त्यावरुन जलदगतीने चालणे, यासारखा दुसरा व्यायाम नाही. यामुळे रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होऊन काम करण्यासाठी दिवसभर पुरेसी ऊर्जा मिळते. थकवा जाऊन काम करण्याचा उत्साह वाढतो. वाढता तणाव कमी करण्यासाठी व विविध आजारावर रामबाण उपाय ठरणाऱ्या ‘मॉर्निंग वॉक’साठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्यावर वाढलेली आहे. शहरातील पिपरी (मेघे) भागात असलेल्या टेकडी परिसरात तसेच जिल्हा स्टेडिअमवर दररोज गर्दी पहावयास मिळते. हिवाळा सुरू होताच गुलाबी थंडीत फिरण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. त्यातही स्वत:च्या प्रकृतीविषयी जे जागरुक आहेत, ते नागरिक पहाटे फिरण्याचा दिनक्रम तयार करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच काही ना काही व्याधी जडलेल्या असतात. कामचा ताण तसेच वेळेचा अभाव यामुळे शुगर, रक्तदाब यांसारख्या तक्रारी कॉमन झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी दवाखान्याचे खेटे घातल्याने रुग्णाच्या खिशाला झळ पोहचते. त्यापायी होणारे आर्थिक नुकसान टाळले जावे तसेच धकाधकीच्या जीवनातून चार क्षण स्वत:साठी जगता यावे म्हणून नागरिक मॉर्निंग वॉकला पसंती देत तशी सवयच पाडून घेत आहे. महिलांनाही आरोग्याच्या अनेक समस्या सतावत असल्याने त्याही पसंती देत आहे.