शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

अधिक महिन्यात ‘अधिक’चा कचरा

By admin | Updated: July 4, 2015 00:32 IST

अधिक महिन्यात नदीवरील स्नान महत्त्वाचे मानले जाते.

धाम पात्राला अवकळा : दिवे सोडण्यासाठी प्लास्टिक द्रोणच्या वापराने सर्वत्र प्रदूषणपराग मगर वर्धावर्धा : अधिक महिन्यात नदीवरील स्नान महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सध्या जिल्हावासीयांचे जत्त्थे पवनार येथील धाम नदीवर स्नानासाठी जाताना दिसत आहे. परंतु केवळ स्नानच न करता येथे करण्यात येत असलेल्या विधीमुळे आणि त्यात वाढता प्लास्टिकचा वापर यामुळे नदीपात्राला अवकळा आली आहे. त्यामुळे अधिक महिन्यात येथे अधिकचा कचरा साचत आहे. विशेष म्हणजे यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक द्रोणचा खच साचत आहे. अधिक महिना सुरू होऊन पंधरवाडा लोटला आहे. दर तीन वर्षांनी अधिकमास येत असतो. या महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र नद्यांवर स्नानासाठी विशेष करून महिलांची गर्दी असते. अन्य वेळी नदीवर स्नानासाठी जाण्यासाठी वेळ व कारण मिळत नसल्याने बदल आणि हौस म्हणूनही माहिला अधिक मासात स्नानाला जातात. पवनार येथील धाम नदीला प्राचीन महत्व आहे. आसपास असलेल्या मंदिरे, निसर्गरम्य परिसर आणि खडकांनी आच्छादलेले पात्र यामुळे हे स्थान सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. केवळ स्नानापर्यंत ही बाब थांबली असती तर कुठलीही अडचण नव्हती. परंतु यावेळी करण्यात येत असलेल्या पूजेमुळे नदीपात्र आणि परिसरात प्रचंड घाण पसरत आहे. पूजा झाल्यावर महिला दिवा नदीत सोडत असतात. पूर्वी पळसाच्या पाणात, नारळाच्या करवटीत किंवा मातीच्या दिवनालीत हा दिवा सोडला जात असे. परंतु या काही वर्षातही जागा प्लास्टिक द्रोणांनी घेतली आहे. हे द्रोण सहज उपलब्ध होतात. त्यामुळे अशा द्रोणांमध्ये दिवे सोडले जात आहेत. या प्रकारामुळे सध्या धाम नदीपात्रात प्लास्टिक द्रोणांचा खच साचला आहे. पुजेच्या नावाखाली येथे मोठ्या प्रमाणात तांदळाची नासाडीही होत आहे. खडकांवर असलेल्या पिंडीवर तांदूळ, सुपारी व इतरही साहित्याचा खच दिसत आहे. तसेच हे सर्व साहित्य प्लास्टिक पन्नीत आणल्या जाते. या कारणाने प्लास्टिक कचरा ही मोठी समस्या येथे निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत येथे कचरा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परंतु येथे इतक्या वर्षात साधी कचराकुंडी बसविण्याचे सौजन्यही पवनार ग्रामपंचायतने दाखविलेले नाही.(शहर प्रतिनिधी)