शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

राजभाषा मराठीची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:18 IST

मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनवनीत देशमुख : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा धुडगूस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली.आज मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू पाहात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी महाराष्ट्रात धुडगूस घातला आहे. जेवढे जास्त शुल्क तेवढी चांगली शाळा, असे समीकरण झाले आहे. सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळांचा नूर बघण्यासारखा अन् सामान्य मराठी माणसाला बोटे तोंडात घालायला लावणारा असा आहे.बाह्यस्वरूप एकदम चकचकीत. आज देखावाञ महत्त्वाचा झाला आहे. या तुलनेत मराठी शाळा कुठेही बसत नाहीत आणि पुढे जायचं असेल तर मराठी शाळेत शिक्षण घेऊन पुढे जाता येणार नाही, ही धास्ती. शाळांमधून ग्रंथालये हद्दपार झाली आहेत. आमचा इतिहास, आमची संस्कृती याचा विचार आणि अभ्यास जाणून घ्यायला वेळ कुठे आहे? मोबाइल, इंटरनेट या तंत्रज्ञानाने माणसाला यंत्रवत बनवले आहे आयुष्य गतिमान झालं आहे. पळापळा, कोण पुढे पळतो, अशी शर्यत सुरू आहे. लहान-लहान मुलंही मोबाईल हाताळतात. आईवडील कौतुकानं सांगतात. मराठी भाषेविषयी मराठी माणूसच उदासीन आहे. ५ हजारांचा मोबाईल मुलांना घेऊन देऊ शकतो; पण शंभर रुपयांचं पुस्तक घेऊन देणार नाही. मराठी साहित्यात एम. ए झालेल्या तरुणाला सहज विचारलं, पानिपत वाचली काय? तो माझ्याकडे बघतच राहिला. काही वेळाने त्यानं विचारलं, काय आहे पानिपत? डिग्रीला महत्त्व आहे. म्हणून डिग्री कशी पदरात पाडून घ्यायची, ही मानसिकता तयार झाली आहे. इंजिनिअर, डॉक्टर, प्रोफेसर, शिक्षक यापैकी किती लोकांना सानेगुरुजी माहीत नाहीत. वि. स. खांडेकर, प्र.के. अत्रे माहीतच नाहीत. त्यांची पुस्तके वाचणे तर दूरच. असा अनुभव अनेकदा येतो. वाचनाची प्रक्रियाच शाळामधून बंद पडली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतो.ज्या दिवशी प्रत्येकाच्या हातात पुस्तक दिसू लागेल, ते दिवस विकासाचे असतील. हा विकास असेल व्यक्तिमत्त्वाचा, संस्कृतीच्या विकासाचा, देशाच्या अन् राष्ट्राच्या विकासाचा. मुख्यमंत्र्यांनी मराठी सर्व शाळांसाठी बंधनकारक असेल, असे आपल्या भाषणातून कोल्हापूरला सांगितले आहे. त्यामुळे मराठी भाषेला सोनियाचे दिवस पुन्हा पाहता येतील काय?शाळांतील ग्रंथालयांचे अनुदान बंदशाळा, कॉलेजला ग्रं्रथालयात ग्रंथ खरेदीसाठी शासनाकडून अनुदान बंद आहे. परिणामी, ग्रंथपाल, पुस्तके शाळांमध्ये नाही. ज्या समाजाची, देशाची वाचन क्षमता क्षीण होते, त्या समाजात, देशात विकास क्षमता नष्ट होते आणि समाज अधोगतीकडे जातो.