शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधांसाठी काकडदराच्या ग्रामस्थांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:34 IST

काकडदरा येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडवा, त्यांना मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करीत युवा स्वाभिमान पार्टीने एसडीओ कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देखटिया खडी आंदोलनाचा इशारा : गावाला फुटलेल्या पाईपलाईनचे ग्रहण

ऑनलाईन लोकमतआर्वी : काकडदरा येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडवा, त्यांना मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करीत युवा स्वाभिमान पार्टीने एसडीओ कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांना निवेदन दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास खटीया खडी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.बुधवारी युवा स्वाभिमान पार्टी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात ग्रा.पं. सदस्य पांडुरंग सोरांबे, माजी सरपंच देविदास सयाम यांच्यासह काकडदरा येथील ग्रामस्थांनी एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी शर्मा यांना निवेदन देत चर्चा कररण्यत आली. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही काकडदरा गावात बससेवा उपलब्ध नाही. गौरखडा मार्गे रोहणा रस्ता झाल्यास ५ ते ६ किमी अंतरात काकडदरा गावात पोहोचणे शक्य आहे; पण रस्ता नसल्याने १८ ते २० किमी फिरून यावे लागते. रुग्ण असो वा प्रसूतिची महिला यांना अडचणींचा सामना करावा लागतो. काकडदरा गाव १०० टक्के आदिवासीबहुल असून गावाचा त्वरित बीपीएल सर्व्हे करावा. गरजूंना बीपीएल यादीत समाविष्ट करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या. काकडदरा गावात अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून ती पडण्याच्या स्थितीत आहे. अप्रिय घटना घडू नये म्हणून त्वरित इमारतीचे बांधकाम करावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. पाणी फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम व ग्रामस्थांच्या परिश्रमाने काकडदरा गाव जलमय झाले खरे; पण पाईपलाईन फुटल्याने ग्रामस्थांना एक ते दीड किमी जंगलातून पाणी आणावे लागते. यात श्वापदांची भिती असते. यामुळे त्वरित पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोटफोडे, सुरेंद्र वाटकर, नितीन मनवर, राजू राठोड, कमलेश चिंधेकर, राहुल विरेकर, सिद्धांत कळंबे, भारत पवार, बादल काळे यासह काकडदरा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.