शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारच्या कामांचे नियोजन करा

By admin | Updated: March 12, 2016 02:23 IST

जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे गावात शिवारफेरी घेताना ..

अनुप कुमार : महसूलवाढीच्या उपाययोजनांचा घेतला आढावावर्धा : जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे गावात शिवारफेरी घेताना गावातील सरपंच महसूल अधिकारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व समजावून सांगा, तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी सुरू होतील, या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी येथील जिल्हा यंत्रणेला दिल्या.विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध महसूल वसुलीसंदर्भात दिलेल्या उद्दीेष्टांचा तसेच जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला.जिल्ह्यासाठी महसूल गोळा करण्यासाठी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेताना अनूप कुमार यांनी जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टांपैकी गोळा झालेल्या महसूला संदर्भात समाधान व्यक्त केले. अद्यापपर्यंत उद्दीष्ट पूर्ण न केलेल्या तालुक्यांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचनाही केली. मागेल त्याला शेततळे ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तालुकानिहाय नियोजन करावे व दिलेले उद्दीष्ट पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यानुसार काम करण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जि.प.च्या योजनांचाही घेतला आढावा वर्धा : विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यावर झालेल्या उद्दिष्टांसंदर्भात विभागप्रमुखांकडून माहिती घेतली. कारंजा व आष्टी संपूर्ण तालुका निर्मल करण्याच्या दृष्टीने नियोजन करा, तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्यात.जिल्हा परिषदेतील प्रत्येक विषयाचा सखोल आढावा घेताना विभागांना दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करताना जलयुक्त शिवार योजना तसेच मागेल त्याला शेततळे या योजनेचा प्रसार, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी विभागीय आयुक्त यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यासंदर्भात माहिती दिली. मागेल त्याला शेततळे ही योजना लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शनिवार, रविवारी प्रत्येक ंताालुक्यात विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्याला असलेले २ हजार २४ शेततळ्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)