शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुद्रा ऋण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:05 IST

स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या होतकरू युवकांना प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने पंतप्रधान मुद्रालोन योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्याचा तरुण-तरुणींनी लाभ घेतला पाहिजे, .....

ठळक मुद्देरमेश बोभाटे : प्रधानमंत्री मुद्रा ऋण योजना प्रचार व प्रसार एकदिवसीय प्रशिक्षण मेळावा

ऑनलाईन लोकमतसमुद्रपूर : स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या होतकरू युवकांना प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने पंतप्रधान मुद्रालोन योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्याचा तरुण-तरुणींनी लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन स्थानिक विद्या विकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश बोभाटे यांनी केले.जिल्हा समन्वय समिती मुद्रा योजना वर्धा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था समुद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रालोन योजना प्रचार व प्रचार एकदिवसीय प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार दीपक करंडे, जिल्हा महिती अधिकारी मनिषा साबळे, सहा. संचालक गोस्वामी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय वर्धाचे प्रमुख मार्गदर्शक सम्राट वर्मा, बँक आॅफ इंडिया जामचे शाखा व्यवस्थापक राकेश कदम, डी. डी. कुंभारे, डॉ. निरझर कुलकर्णी, सचिन कापकर, शिवाजी चौधरी, उषा काळे, नायब तहसीलदार सूर्यवंशी, निमजे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी ग्रामीण युवकांनी स्वयंरोजगाराच्या संधीचा शोध घेऊन लहान-मोठे उद्योग उभारून आपले जीवनमान उंचाविले पाहिजे, असे सांगितले. जिल्हा उद्योग केंद्र वर्धाच्या उषा काळे यांनी भावी उद्योजकांचे अंगी कोणते कौशल्य असावे याविषयी माहिती दिली. बँकचे शाखा व्यवस्थापक वर्मा यांनी बँकेचा कसा विश्वास संपादन करण्याचा, कर्ज परतफेड कसे करावे, आपली पत कशी वाढेल याची माहिती उपस्थितांना दिली.गोस्वामी यांनी मुद्रा लोन हे व्यवसाय करणे, उत्पादन किंवा सेवा देणाºयांना ५० हजारापासून ते १० लाखपर्यंत कर्ज देऊ शकते. यात तीन प्रकार आहे. शिशू, किशोर व तरूण या तीन गटात योजनेचे लाभ घेणाºयांचे वर्गीकरण करण्यात येते. शिशु श्रेणी अंतर्गत ५० हजार रूपये, किशोर श्रेणीत ५ लाखपर्यंत तर तरूण श्रेणीत १० लाखपर्यंत कर्ज दिल्या जाते. आपण कसे योग्य आहोत हे आपल्याला बँकेला पटवून देऊन उद्योजकांनी टप्प्या टप्प्याने आपली प्रगती करावी असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.भारतीय युवा ट्रस्टचे राकेश कदम यांनी यशस्वी उद्योजक कसा असतो. वर्धा जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांनी आपली प्रगती कशी साधली, यावर प्रकाश टाकला. प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, यावर डी. डी. कुंभारे यांनी मार्गदर्शन केले. सदर एकदिवसीय मुद्रालोन प्रशिक्षणात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आयटीआय, एम.सी.व्ही.सी.च्या विद्यार्र्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा होईल यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमादरम्यान यशस्वी उद्योजक स्वप्नील निमजे, सौरभ वरघणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य निमजे यांनी केले. संचालन प्रा. अभय दांडेकर यांनी केले. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी उमेश खारोडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला आय. टी. आय. समुद्रपूर, गिरड, विद्या विकास महाविद्यालयाच्या एम. सी. व्ही. सी. विभागाच्या विद्यार्थी, विकास कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर, कोराचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता सर्व कर्मचाºयांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. तरुणांना मेळाव्याच्या माध्यमातून उद्योग उभारणीबाबत माहिती देण्यात आली.