शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पैशाकरिता विवाहितेला रॉकेल टाकून पेटविले

By admin | Updated: February 6, 2017 00:58 IST

माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तरोडा येथील घटना : महिलेचा मृत्यू; पती व सासऱ्याला अटक कारंजा (घाडगे) : माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर आपली मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसताना सासरच्या मंडळीने विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कारंजा तालुक्यातील तरोडा येथे शनिवारी रात्री घडली. सीमा अमोल मुन्ने (२३) असे मृतक महिलेचे नाव आहे. सीमाची नातेवाईक पिंगळाबाई चौधरी रा. परसोडी यांनी रविवारी घटनेची तक्रार कारंजा पोलिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सीमाचा पती अमोल मुन्ने (२७), सासरे काशिनाथ मुन्ने व सासु चंद्रकला मुन्ने या तिघांवर भादंविच्या कलम ४९८ (अ), ३०४ (ब) व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करताच पोलिसांनी पती अमोल आणि सासरा काशिनाथ या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हिचा विवाह अमोल याच्याशी सन २०१२ मध्ये झाला. विवाहानंतर सासरची मंडळी सीमाकडे माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत होते. याकरिता पती व सासू-सासरे तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. यातच शनिवारी सायंकाळी सीमा हिला सासरच्या मंडळीची त्रास देणे सुरू केले. यात आपली मागणी पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच मुन्ने परिवाराने सीमाच्या अंगावर घरातच रॉकेल टाकून पेटवून दिले. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर घटनेची माहिती शेजारच्या मंडळींना नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासरे या दोघांना ताब्यात घेतले आहे.(शहर प्रतिनिधी)