शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षानंतर मोई गावाला मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:23 IST

डोंगर माथ्यावरील रेड झोन मध्ये असलेल्या मोई गावाला पाणीपुरवठ्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शेवटी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ७५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देदादाराव केचे यांची पत्रपरिषद : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल अंतर्गत ७५ लाख मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : डोंगर माथ्यावरील रेड झोन मध्ये असलेल्या मोई गावाला पाणीपुरवठ्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शेवटी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ७५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पंचायत समिती सभापती निता होले, जिल्हा परिषद सदस्या छाया घोडिले, अंकिता होले, मोईचे उपसरपंच किसन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, भाजपा शहर अध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, भाजयुमो आर्वी विधानसभा प्रमुख गजानन भोरे, युवा मोर्चा महामंत्री राहुल बुले, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळपांडे, सिराज अहमद, दिनेशसिंग चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.मोई पाणीपुरवठ्याबाबत माहिती देताना दादाराव केचे यांनी सांगितले की, दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण व्हायची, गावकºयांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी प्रत्यक्ष गावकºयांना विश्वासात घेवून आश्वासन दिले होते. योजना कार्यान्वित होण्यासाठी आमदार असताना शासनदरबारी सातत्याने प्रयत्न केले. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असल्यामुळे मंजुरीसाठी अडचण येत होती. आता आमदार नसताना देखील भाजपाचे सरकार असल्याने वारंवार मुंबईला जाऊन मागणी लावून धरली.१४ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला प्रशासकीय मान्यता प्रदान करावी यासाठी प्रस्ताव सादर झाला. पाणीपुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित असताना १५ जानेवारी २०१८ रोजी सदर प्रस्तावास मान्यता प्रदान करण्याचे आदेश मिळाले. २९ जानेवारी २०१८ ला ७५ लाख रुपये मंजूर झाले व शासन निर्णय निघाला.मोई वासियांच्या प्रलंबित मागणीला आपण ३५ वर्षाच्या संघर्षाचे साक्षीदार ठरलो आणि कायमस्वरुपी प्रश्न निकाली निघाला असे त्यांनी सांगितले. योजना कार्यान्वित झाल्याबरोबर सुसुंद्रा तलावावरुन फिल्टर प्लॅन्टसहीत योजनेचा गावकºयांना लाभ होईल, असे दादाराव केचे यांनी सांगितले. यावेळी मोई गावातील सर्व ग्रा. प. सदस्य व नागरिकांनी केचे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.