शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला

By admin | Updated: June 28, 2014 00:36 IST

सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकरी वर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांनी केला आहे.

वर्धा : सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकरी वर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांनी केला आहे. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी शेतमालाच्या हमी भावाजी घोषणा केली आहे़ मोदी सरकारने धानाच्या हमी भावात ५० रूपये प्रती क्विंटल, कापसाच्या हमी भावात ५० रू़ क्विंटल ची वाढ केल्याचे जाहीर केले आहे़ २०१३-१४ च्या हंगामासाठी धानाचा हमी भाव १ हजार ३१० रू़ प्रति क्विंटलचा होता़ तो १ हजार ३६० रू़ जाहीर करण्यात आला आहे़ कापसाचा हमी भाव ४००० रू़ प्रति क्विंटलचा भाव होता तो ४ हजार ५० रू़ जाहीर करण्यात आला़ पण वास्तविक चित्र हे आहे की ही भाव वाढ निवडणुकीच्या पूर्वीच माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग सरकारने जाहीर केलेली आहे़प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या जाहीर सभेतून शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा हिशोबात घेवून भाव जाहीर करण्याचे वचन दिले होते़ त्याप्रमाणे धानाचा हमी भाव १ हजार ६८४ रू़ व कापसाचा हमी भाव ५ हजार १२० रू़ प्रती क्विंटल जाहीर करणे मोदी सरकारचे कर्तव्य आहे़ पण मोदी सरकारने डॉ़ मनमोहन सिंगच्या सरकारने जाहीर केलेलेच हमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. डॉ़ मनमोहन सिंगजीच्या चुकींच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, असे प्रधानमंत्री मोदीजी म्हणायचे मग आता या घोषीत हमी भावात शेती नफ्याची होणार काय असा सवालही त्यांनी केला आहे.(शहर प्रतिनिधी)