शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कारमधील मोबाईलने दिला मारेकऱ्यांचा सुगावा

By admin | Updated: July 20, 2016 01:39 IST

समुद्रपूर तालुक्यातील हिवरा येथील माजी जि.प. सदस्य तथा सभापती छत्रपती थुटे रा. सावरखेडा यांना मारहाण करून

छत्रपती थुटे हत्याप्रकरण : पोलीस आरोपींच्या शोधात; वर्धेतून एकाला घेतले ताब्यातवर्धा : समुद्रपूर तालुक्यातील हिवरा येथील माजी जि.प. सदस्य तथा सभापती छत्रपती थुटे रा. सावरखेडा यांना मारहाण करून घटनास्थळी कार सोडून मारेकरी पसार झाले होते. या कारमध्ये सापडलेल्या एका मोबाईलवरून या मारेकऱ्यांचा पोलिसांना सुगावा लागला आहे. त्यांची ओळखही पटली आहे. यात एकाला वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. इतर आरोपी सध्या कुठे आहे, याचा पत्ता नसल्याने अटकेच्या कारवाईत पोलिसांना अपयश येत असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती थुटे यांची हत्या गावातीलच इसमांनी केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्यांची नावेही पोलिसांना माहिती आहेत; पण तपासाची बाब म्हणून पोलिसांनी नावे सांगण्यास नकार दिला आहे. या आरोपींना अटक केल्यानंतरच छत्रपती थुटे यांच्या हत्येच्या कारणाचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी त्यांची हत्या शेतीच्या वादातून करण्यात आल्याची चर्चा गावात आहे. गावातून फरार या आरोपीच्या शोधात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत; पण त्यांच्या हाती अद्याप काहीच आले नाही. प्रारंभी छत्रपती थुटे यांना मारहाण करणारे दारूविक्रेते असावे, असा संशय पोलिसांना असल्याने त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता; मात्र वाहनात सापडलेला मोबाईल गावातीलच इसमाचा असल्याने त्याचा शोध घेतला असता तो घटनेच्या दिवसापासून गावातून फरार असल्याचे समोर आले. या संदर्भात पोलिसांनी शोध घेतला असता मोबाईलशी संबंधित युवकांनीच छत्रपती यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सुत्रांनी दिल्याने तपासाला गती आली आहे.छत्रपती थुटे यांची हत्या अपघात दिसावा याकरिता प्रथम त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यातून ते बचावले. ही घटना ज्या मार्गावर घडली, त्या मार्गावर हे मारेकरी मुद्दाम थांबले. धडक देणारी कार उभी दिसल्याने छत्रपती थुटे विचारणा करण्याकरिता येतील, अशी खात्री त्यांना असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यावेळी बेदम मारहाण केल्याने थुटे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे दाखल केले असता त्यांचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी करीत शिवसैनिकांनी समुद्रपूर येथे आंदोलन करून निवेदन सादर केले होते.(प्रतिनिधी)वर्धेत दोन दिवसांत तीन हत्या ४वर्धा जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून हत्येचे सत्रच सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात तीन हत्या झाल्या आहेत. या हत्यांच्या सत्राचा प्रारंभ समुद्रपूर येथील छत्रपती थुटे यांच्या हत्येने झाला. या हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेणे सुरूच असताना समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे सोमवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह मिळून आला. त्याची हत्या करून मृतदेह येथे फेकण्यात आल्याचे समोर आले. त्याची ओळख पटली असून भाऊराव पूर्णचंद्र पुनवटकर रा. वडगाव (आ.) ता. वरोरा जि. चंद्रपूर असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची हत्या कुणी व कशाकरिता केली, याचा शोध समुद्रपूर पोलीस घेत आहेत. ४जिल्ह्याचे लक्ष समुद्रपूर येथील थुटे यांच्या हत्या प्रकरणाकडे असताना कारंजा (घाडगे) येथे एका मुलीने तिच्या दारूड्या पित्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. रमेश गाडरे याला दारूचे व्यसन होते. तो रविवारी दुपारी धुंदीत घरी आला. यावेळी त्याची पत्नी व मुलगी ज्योती या दोघी घरी होत्या. या दोघींशी वाद घालत रमेश याने घरातील साहित्याची फेकाफेक करणे सुरू केले. यामुळे दोघींनीही घराबाहेर पडत घर बंद केले. कालांतराने त्यांनी घराचे दार उघडले असता रमेश नग्नावस्थेत घरात मृतावस्थेत आढळला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला असता त्याची हत्या त्याच्या मुलीनेच केल्याचे समोर आले. यावरून ज्योतीला रात्री अटक करण्यात आली असून तिने हत्येची कबुली दिली.