शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

१० कोटींच्या निधीवरुन आमदार व नगर पालिका आमने-सामने

By admin | Updated: May 24, 2016 02:10 IST

वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत शहरातील विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे.

राजकीय पेच : विकास कामांसाठी सर्वांनी एकत्र यावे- कुणावारहिंगणघाट : वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत शहरातील विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. ही कामे नगर पालिका करण्यास सक्षम असल्याची भूमिका घेत पालिकेने न्यायालयातून स्थगिती आणली, तर आ. कुणावार यांनी कामे कोण करतो यापेक्षा कामे होणे महत्त्वाचे अशी भूमिका घेत शहर विकासासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. एकूणच या निधीवरुन आमदार व पालिका आमने-सामने आल्याचे चित्र आहे. वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत शहरातील विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे; शासन निर्णयातील अट क्रमांक तीननुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला निश्चित केले. त्यावर हिंगणघाट नगर परिषदेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. ही १० कोटींची कामे हिंगणघाट पालिका हद्दीत होत आहे. पालिकेत सक्षम अभियंत्यांची यंत्रणा असल्याने परिषदेमार्फतच ही कामे व्हावी, अशी याचिका दाखल करून निर्णयावर स्थगिती आणली. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आ. कुणावार यांनी पक्षभेद विसरुन विकासकामांसाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. आजपर्यंत हिंगणघाटच्या राजकीय इतिहासात कुणालाही शासनाकडून विशेष निधी आणता आला नसल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. यापूर्वी नगरपरिषदेने केलेल्या कामांचा पूर्वइतिहास चांगला नसल्याने आणि दर्जेदार कामांसाठी नगर परिषदेकडे सक्षम यंत्रणा नसल्याने हा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला; पण हिंगणघाटचे नगराध्यक्ष अ‍ॅड. कोठारी यांनी या विकास कामावरच उच्च न्यायालयातून स्थगिती आणून आपल्या विकास विरोधी भूमिकेचे समर्थन केल्याचा आरोपही आ. कुणावार यांनी केला.(तालुका प्रतिनिधी)