शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या चुकीचा भूर्दंड ग्राहकांवर

By admin | Updated: November 7, 2016 00:45 IST

वीज चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची तरतूद असताना नाममात्र कारवाई

नागरिकांना मन:स्ताप : अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली वाढीव देयके वायगाव (नि.) : वीज चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची तरतूद असताना नाममात्र कारवाई करण्यात येत असल्याने वीज चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सोसावा लागत आहे. वीज देयकात अतिरिक्त शुल्काच्या रूपाने वाढ करण्यात आल्याने महावितरणबाबत रोष वाढत आहे.याबाबत वीज ग्राहकांनी संबंधीतांना तक्रारी केल्या. मात्र, दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या महावितरकाच्या देयकात बदल झाला आहे. यात १०० युनिटपर्यंत ३.७६ रूपये व १०० युनिटच्या वर रिडींग झाल्यास ७.२१ रुपये करण्यात आले आहे. महावितरण विभागाने नवीन अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यासाठी एजन्सी मार्फत कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे. ३० दिवसांच्या कालावधीत मीटर रिडींग नेणे अनिवार्य असताना ४० दिवसांनी ते नेण्यात येत असल्याने व त्यातही चुकीचे रिडींगची नोंद टाकण्यात येत आहे. फोटो घेऊनही देयकावर नो रिडींग लिहून देत आहे. चुक कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, भूर्दंड ग्राहकांना बसत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जास्त दिवसाचा कालावधील लोटल्याने रिडींग जास्त होत असून जास्त दराचे देयक नागरिकांना भरावे लागत आहे. तसेच वीज चोरीचाही फटका सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागत आहे. महावितरणने जर आयोगाने दर्शविलेल्या दराप्रमाणे वीज खरेदी करीत असेल तर देयकात वीज शुल्क लावण्याचा अर्थ काय, असा प्रश्न ग्राहकांना उपस्थित करीत आहे. वीज चोरीचा भार सर्व सामान्यांवर लादला जात असल्याने ते आर्थिक संकटता सापडले आहेत. वीज ग्राहकांना देयकातील वाढीव शुल्काच्या रूपाने अतिरिक्त भार माथी मारल्या जात असल्याचे दिसून येते. शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात दिवसेंदिवस भर पडत असून याकडे संबंधीत अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या भागातील ग्राहक वीज दयक थकबाकी ठेवतात. त्या भागातील नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागतो. सध्या रबी हंगामाची तयारी शेतकरी करीत असून भाजीपाल्यासह रब्बी पीकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना ओलीतासाठी चोविस तास विजेची आवश्यक्ता आहे. मात्र, वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधीतांनी लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)