शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

एकुर्ली गावातील स्मशानभूमीच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:51 IST

प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात.

ठळक मुद्देग्रामस्थांची गोची : शेताचा घ्यावा लागतो आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात. यामुळे लगतच्या शेतांचा आधार घेत अंत्यविधी उरकावा लागतो. असाच प्रकार एकुर्ली गावातही पाहावयास मिळतो. या प्रकारामुळे अंतिम संस्कार करताना ग्रामस्थांची गोची होते. याकडे लक्ष देत स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) नजीकच्या एकुर्ली गावातील स्मशानभूमी बकाल झाली आहे. स्मशानभूमिच्या नावावर एकुर्ली येथे केवळ अल्लीपूर मार्गावर मुख्य रस्त्याच्या कडेला स्मशानशेड आहे. ही स्मशानभूमी दुर्लक्षित असून शेड पूर्णत: जीर्ण झाले आहे. तळेगाव (टा.) जि.प. सर्कलमध्ये येणाºया एकुर्ली गावातील दहा वर्षांपासून पं.स. सदस्य तर सध्या जि.प. सदस्यही आहेत. ते सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे जि.प. सदस्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.स्मशानभूमी नसल्याने एकुर्लीतील एका शेतकºयाच्या शेतात अग्नी द्यावा लागतो; पण पे्रताला अग्नी देताना पाऊस आल्यास नागरिकांसह पे्रतालाही पाण्याशी झुंज द्यावी लागते. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. स्मशान शेडला झुडपांसह वेलींचा विळखा असून मृतदेह शेडपर्यंत पोहोचविणेही कठीण झाले आहे. रात्री अंतिम यात्रा न्यायची असल्यास कुठेही पथदिव्यांची व्यवस्था नाही. सहभागींना गॅसबत्तीचा वापर करावा लागतो. पाण्याची सुविधा नसल्याने शेतातील विहिरीचा वापर करावा लागतो. अंत्यसंस्कारात येणाºया या अडचणींकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.पाणी, पथदिवे, बसण्याकरिता ओटेही नाहीतस्मशानभूमीमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असते; पण एकुर्ली येथे स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड आणि तेही जीर्ण अवस्थेत उभे असल्याने अन्य सुविधांबाबत विचारही करता येत नाही. येथे शेतातील विहिरीचे पाणी अंत्यसंस्कारासाठी वापरावे लागते. रात्री अंत्ययात्रा निघाल्यास काळोखातून वाट काढावी लागते. कुठेही पथदिवे नाही. स्मशानभूमित बसण्यासाठी ओटे नाहीत की वृक्षांची सावलीही नाही. यामुळे अंत्ययात्रेतही अनेक समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावाकडे दुर्लक्ष करणारे सदस्य सर्कलच्या समस्या कशा सोडवतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.