शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

कृषी सहायक महिन्याभरापासून बेपत्ता

By admin | Updated: September 18, 2015 01:55 IST

शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात; पण गत एक महिन्यापासून तेच बेपत्ता आहेत.

मार्गदर्शनाचा अभाव : शेती कार्यशाळा घेण्यासही बगलच तळेगाव (श्या.पंत.) : शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात; पण गत एक महिन्यापासून तेच बेपत्ता आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शनच मिळत नसल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तळेगाव, रानवाडी व बेलोरा खुर्द या साझाकरिता एक कृषी सहायक असून ते गत एक ते दीड महिन्यापासून बेपत्ता आहे. शेतकरी कार्यालयात चकरा मारून थकले; पण कृषी सहायक मिळत नाही. तळेगाव-आष्टी मार्गावरील कृषी चिकित्सालयाचाही बेताल कारभार आहे. गोदामाची चौकशी झाल्यास तेथे शेतकऱ्यांना शासनाकडून येणारी कृषी रसायने, कृषी साहित्य नांगर, एक दात्याचे पेरणीयंत्र, कलमा, पाईप धूळखात पडून आहे. २०१३-१४ मध्ये फळबाग लागवडीसाठी कलमांचे प्रस्ताव सादर केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ देण्यात आला नसल्याच्या तक्रारी आहेत. तो लाभ परस्पर कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उचलल्याचेही तक्रारीत नमूद आहे.तळेगाव, काकडधरा, रामदरा, शिर्री, रानवाडी, बेलोरा खुर्द या साझामध्ये सुमारे दहा हजार शेतकरी आहे. खरीपाची पिके असल्याने शेतकरी पूर्णत: कृषी विभागावर अवलंबून आहे; पण त्यांना योग्यवेळी मार्गदर्शन मिळत नाही. दरवर्षी मार्गदर्शनार्थ शेतीशाळा घेतल्या जात होत्या; पण यंदा शेती कार्यशाळा कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. आमदार अमर काळे यांनी कारंजा शहरातील कृषी विभागाच्या गोदामांची पाहणी केली. यात अनियमितता आढळून आली. असाच प्रकार आष्टी तालुक्यातही आहे. आष्टी तालुका कृषी विभागांतर्गत येणाऱ्या तळेगावच्या रोपवाटीकेमधील गोदामाची पाहणी केल्यास तेथेही शेतकऱ्यांना वितरित न केलेले कृषी साहित्य बेवारस पडून असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)