शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शौचालये झालीत गैरव्यवहाराचे साधन

By admin | Updated: December 31, 2016 02:00 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावोगावी शौचालयांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. संपूर्ण गावे

कंत्राटदारांचे चांगभले : गावांच्या हागणदारीमुक्तीपूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप वर्धा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावोगावी शौचालयांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. संपूर्ण गावे हागणदारीतून मुक्त व्हावी म्हणून लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदानही दिले जात आहे; पण ही शौचालये गैरप्रकाराचे साधन ठरत असल्याचेच दिसून येत आहे. बहुतांश गावांमध्ये शौचालयांच्या बांधकामात गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. याकडे लक्ष देत चौकशी करणेच गरजेचे झाले आहे. सर्व गावे हागणदारीमुक्त व्हावीत, गावातील वातावरण स्वच्छ व सुंदर होऊन आरोग्य चांगले राहावे म्हणून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचाल् ाय बांधकामांना प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. बांधकामाचे उद्दिष्ट ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे. यामुळे ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्यांच्या सहमतीने शौचालयांचे बांधकाम होणे गरजेचे आहे; पण बहुतांश गावांत ग्रामविकास अधिकारी व सरपंच संगणमताने शौचालय बांधकामाचे कंत्राट देत आहेत. यात प्रती शौचालय दोन ते तीन हजार रुपयांचा अपहार करीत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदने दिली जात असल्याचेही पाहावयास मिळते. यामुळे जिल्हा प्रशासन व जि. प. प्रशासनाने शौचालय बांधकामांची सखोल चौकशी करीत दोषींवर दंडात्मक कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी) जुवाडी येथील सरपंच, उपसरपंचांना पदमुक्त करा - ग्रामस्थांची मागणी सेलू : पंतप्रधान ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गावात शौचालय बांधकामाची यादी प्रकाशित झाली. सदर बांधकाम लाभार्थ्यांनी स्वत: वा कंत्राटदाराकडून करण्याचे ठरले. यानंतरही जुवाडी येथील सरपंच व उपसरपंचांनी त्यांच्याकडून शौचालयांचे बांधकाम करून घेण्यास लाभार्थ्यांवर दबाव टाकला. सरपंच व उपसरपंच यांनी स्वत:च शौचालयांचे बांधकाम केले. यामुळे त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत शिवसेनेचे तालुका संघटक सुनील पारसे व लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदनही सादर केले. घटनात्मकरित्या लोकप्रतिनिधी या नात्याने कोणतेही कंत्राटी काम सरपंच व उपसरपंच यांनी करणे नियमबाह्य आहे. असे असताना त्यांनी बांधकाम केले. यानुसार त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना पदमुक्त करावे. सदर बांधकामात गैरप्रकार झाल्याच्या अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. सरपंच व उपसरपंच हजर असताना चौकशी करण्यात आली. त्यात दोघेही अडकले असताना त्यांनी दबाव टाकत स्वत:ची सुटका करून घेतली. हा घटनाक्रम लोकशाहीस मारक आहे. यामुळे ग्रामस्थांत चिड निर्माण झाली आहे. सदर सरपंच, उपसरपंच यांना पदमुक्त करून चौकशी करावी व सामान्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही शिवसेना तालुका संघटक सुनील पारसे व लाभार्थ्यांनी निवेदनातून जिल्हा प्रशासनाला केली आहे.(तालुका प्रतिनिधी) अन्यथा तीव्र आंदोलन ४जुवाडी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास शिवसेना व ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.