शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम रेल्वेस्थानक मॉडेल करण्याला मंत्रालय सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:41 IST

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून............

ठळक मुद्देखासदारांची माहिती : लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून विकसीत करावे या सोबतच गांधीजींची कर्मभूमी सेवाग्राम ते जन्मभूमी पोरबंदर येथील संदिपनी आश्रम रेल्वे सेवेनी जोडले जावे, अशी मागणी खा. तडस यांनी केली.खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष त्याकडे वेधले. रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी सदर प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले की, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त अत्यंत चांगला प्रस्ताव खा. तडस यांनी मांडला आहे. रेल्वे मंत्रालय नक्कीच या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रस्ताव पुर्णत्वास नेईल, असे स्पष्ट केले.आपल्या लोकसभेतील प्रश्नोत्तर काळाच्या उत्तरातून स्पष्ट करताना रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त विविध कार्यक्रम आणि परीयोजना देश भर राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच झालेला आहे. खासदार रामदास तडस यांच्या सूचना आणि निवेदन अत्यंत महत्वपूर्ण असून त्यांच्या मागणीवर रेल्वे मंत्रालय नक्कीच सकारात्मक विचार करून वेळीच योग्य निर्णय घेईल, असेही सांगितले. सदर विषय पूर्णत्वास गेल्यास सेवाग्राम रेल्वे स्थानकाचा चेहरा बदलणार आहे.रेल्वे मार्गाचा विद्युतीकरण प्रस्ताव केंद्र शासन २०२२ पर्यंत पूर्ण करणारसंसदेमध्ये आपल्या पुरवणी प्रश्न क्र. २ नमुद करताना खासदार रामदास तडस यांनी मुद्दा उपस्थित केला की, वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे कार्य २०१४ नंतर पंतप्रधान कार्यालयाच्या प्रगती पोर्टलच्या देखरेखीखाली अत्यंत चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे. हा नवीन रेल्वे मार्ग प्रारंभी डिझेल इंजिनचा उपयोग कार्यान्वीत करणे प्रस्तावीत आहे. परंतु, पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन भविष्यामध्ये वर्धा-नांदेड नवीन रेल्वे मार्ग विद्युतीकरणासह पूर्ण करण्यात केंद्र शासनाचे नियोजन आहे काय, याबाबत रेल्वे मंत्री यांच्याकडे स्पष्टीकरण मागीतले. सदर पुरवणी प्रश्नाला उत्तर देतांना रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी स्पष्ट केले की, २०२२ पर्यंत भारतातील जवळपास सर्व रेल्वे मार्ग वर्धा-नांदेड प्रकल्पासह पूर्ण करण्याकरिता शासन कटीबद्ध आहे. शिवाय २०२२ पर्यंत हा मार्ग विद्युतीकरणाकरिता प्राधान्याने विचारात घेऊन पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.आज उपस्थित केलेल्या वर्धा लोकसभा क्षेत्रातील दोन महत्वाचे विषय लोकसभेत चर्चा झाल्याने निश्चितच मार्गी लागतील आणि त्याकरिता माझा सतत पाठपुरावा सुरु असेल. वर्धा लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू. शिवाय नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठीही प्रयत्न केले जाईल, असे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस